Learn how to cure corona in the village 
कोल्हापूर

गावतील कोरोना रुग्ण गावातच होणार बरा जाणून घ्या कसा

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे रुपांतर कोरोना कक्षात केले जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 900 शाळांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, सध्या असणारी रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हा पर्याय वापरला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांना ठेवायचे कुठे? हा सर्वात मोठा प्रश्‍न जिल्हा प्रशासनाकडून निकालात काढला जाणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात अनुदानित 692, विनाअनुदानित 72, कायम विनाअनुदानित 83, स्वयंमअर्थसहाय्यीत 43 व कनिष्ठ महाविद्यालेय 152 आहेत. याशिवाय, इतर प्राथमिक शाळाही आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 56 रुग्णालये आरक्षित केली आहे. यामध्ये, आतापर्यंत 2 हजार 650हून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 
दरम्यान, प्रत्येक दिवशी 200 ते 350 कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णांना सर्व सुविधा व सुरक्षित औषधोपचार करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे, ज्या गावतील रुग्ण त्याच गावात त्याला सर्व सुविधा देता येतील. तसेच, ज्या कोरोना रुग्णाची घरी राहून उपचार घेण्याची इच्छा व सर्व सुविधा आहे. अशांनही घरी ठेवण्यासाठीही नियोजन केले आहे. 
जिल्ह्यात सुमारे 1900 शाळा आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाच ते दहा खोल्या आहे. काही ठिकाणी हायस्कूलही आहेत. यातील खोल्या वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे गावागावांतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळाच कोरोना कक्ष केले जाणार आहे. 
जिल्ह्यातील 56 कोरोना कक्षात सध्या 2 हजार 650 रुग्ण उपचार घेत आहे. यामध्ये, काही कोरोना कक्ष व उपचार घेणार रुग्ण. 

दृष्टिक्षेपात कोरोना कक्ष 
रुग्णालय* कोरोना कक्षात उपचार घेणारे रुग्ण 
सीपीआर* 208 
इचलकरंजी आयजीएम* 145 
संजय घोडावत* 252 
शिवाजी विद्यापीठ* 251 
डी.वाय.पाटील*96 
असोलेशन हॉस्पिटल* 10 
गडहिंग्लज* 59 
चंदगड* 146 

प्राथमिक, माध्यमिक शाळा कोरोना कक्ष करण्याचे नियोजन आहे. ज्या रुग्णांना घरी राहून उपचार घेता येतो. त्यांच्यावर घरीच उपचार दिले जातील. तर ज्यांच्याकडे स्वतंत्र व्यवस्था नाही, अशाना गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्येच उपचार दिले जातील. शाळांनाच कोरोना कक्ष केले जाणार आहे. सध्या ज्या ठिकाणी कोरोना कक्ष आहे, त्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर तत्काळ कोरोना रुग्णांना शाळांमध्ये उपचार दिले जातील. 
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN-Aadhaar linking : 31 डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड होणार रद्द? ₹1,000 दंड द्यावा लागेल? जाणून घ्या मोठा अपडेट!

Dhule Municipal Election : भाजप-शिवसेना नेत्यांची बंद दाराआड खलबते; जागावाटपाचा पेच सुटणार की स्वबळाची तयारी सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : तमाशाच्या कार्यक्रमात तरुणाला बेदम मारहाण

तुमच्यात कट्टर वैर होतं? श्रीदेवीसोबतच्या वादावर अखेर माधुरी दीक्षितने सोडलं मौन; म्हणाली- आम्ही दोघी...

फक्त दहावी पास अन् Government Job! इस्त्रायलमध्ये नोकरीची संधी, १,६०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT