majhi vasundhara abhiyan sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : चला, आपली वसुंधरा वाचवूया

महापालिकेकडून तयारी सुरू; दहा हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चला, आपली वसुंधरा वाचवूया

महापालिकेकडून तयारी सुरू; दहा हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा

Lets save our planet

कोल्हापूर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेने सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. पर्यावरण चळवळीला बळ मिळावे यासाठी दहा हजारांहून अधिक देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पंचगंगा नदी प्रदूषण, वायू तसेच ध्वनी प्रदूषणाच्या निमित्ताने शहराची राज्यभर चर्चा झाली. पंचगंगेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ७६ एमएलडीचा एसटीपी उभारला गेला. ९६ एमएलडी सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळत होते. कसबा बावडा येथील ७६ एमएलडीचा एसटीपी, बापट कॅम्प, लाईन बाजार तसेच दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यात थोड्याफार प्रमाणात हातभार लागला आहे. (majhi vasundhara abhiyan)

आयआरबीच्या रस्ते प्रकल्पामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली. नंतर वृक्ष लागवडीवर भर देण्यात आला. हरितपट्टे विकसित झाले. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सायलेंट झोनची दहा वर्षांपूर्वी उभारणी झाली. नंतर झोनही गायब झाले. राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणाच्या दृष्टीने नेमकी काय पाऊले उचलली आहेत याची माहिती मागविली आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत अभियान चालणार आहे. महापालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायत क्षेत्रात चांगले काम झाले आहे त्यांचा पारितोषिके देऊन गौरव होणार आहे.(IRB road project resulted in large-scale deforestation)

महापालिकेची तयारी अशी

  • कोल्हापूरला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी

  • गूळ बाजारपेठ, कोल्हापुरी चप्पल ही वैशिष्ट्ये

  • खुल्या जागा व अन्य ठिकाणी दहा हजारांहून

  • हेरिटेज वृक्षांचे सर्वेक्षण सुरू

  • मूर्ती विसर्जन नदी तसेच तलावाऐवजी इराणी खाणीत

  • साठ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनेल प्रकल्प

  • तेरा खासगी तसेच शासकीय रोपवाटिकांचा समावेश

  • २०४२ ची लोकसंख्या गृहीत धरून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होणार

  • पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून १६० कृत्रिम गणेश विसर्जन कुंड

  • दोनशे मेट्रिक टन कचऱ्यावर आर. डी. एफ. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया

  • चांगल्या प्रतीच्या वृक्ष लागवडीसाठी उद्यान विभाग रोपवाटिका तयार करणार

  • बावड्यात तीस मेट्रिक टन क्षमतेचा, मैलखड्डा येथे दोन मीटर क्षमतेचा प्रकल्प

  • बायोमायनिंगद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प मे २०२२ पर्यंत पूर्ण होणार

  • अंबाबाई मंदिरामुळे देशभर कोल्हापूरची ओळख

  • न्यू पॅलेस, रंकाळा तलाव ही प्रेक्षणीय स्थळे

  • अधिक देशी प्रजातीच्या वृक्षांचे रोपण

  • ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी पाच टन क्षमतेचे

  • बायोगॅस प्रकल्प पुईखडी व लाईन बाजार येथे कार्यरत

  • नव्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक

  • स्वयंसेवी संस्था, बचत गट, गृहनिर्माण सोसायटींचा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT