liquor bill of fifty two thousand rs viral on social media viral news of bangalore wine shop 
कोल्हापूर

वा रे बहाद्दरांनो ! तब्बल 52 हजाराची दारु घेतली अन् बिल टाकलं सोशल मीडियावर पण आता झालं अवघडच...

सकाळवृत्तसेवा

बंगळूरू - देशात काही प्रमाणात लॉक डाऊन शिथिल झाल्या नंतर, दारु विक्रीला परवानगी मिळाली आहे.तळीरामांनी हिच संधी साधत दारु खरेदीसाठी लांबच्या लांब रांगा लावल्या. अशातच  दारू खरेदी केल्याच्या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 52 हजार 841 रुपयांचं दारू खरेदी केल्याचं हे बिल आहे. एवढ्या रुपयांची दारू विकत घेतल्याचं हे बिल व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर इतकी दारू विकत घेणारी ही व्यक्ती कोण आहे ? हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारी यंत्रणे मार्फत याचा तपास झाल्यानंतर खुलासा झाला आहे.काही सोकांनी एकत्रितपणे दारू विकत घेतली अन् हा अभिमान व्यक्त करण्यासाठी ते बिल मात्र सोशल मीडियावर पोस्ट केलं. काही वेळातच ते व्हायरल ही झालं. याप्रकरणी बेंगळुरू उत्पादन शुल्क विभागानं दुकानदारावर अधिक मद्य विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि ते खरेदी करणारे नेमके कोण याचा शोध सुरु केला आहे.

सोमवारी दारूची दुकानं उघडलल्या नंतर देशभरात तळीरामांनी दारूसाठी गर्दी केली. त्यात या लोकांनी 52,841 रुपयांची दारू खरेदी केली. 48.5 लिटर दारूचं हे बिल सोशल मीडियावर पोस्ट केलं. व्हॉट्सअ‍ॅपवर हे बिल काही वेळातच तुफान व्हायरल झालं. हे व्हायरल झाल्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. अबकारी अधिकाऱ्यांनी दुकान मालक एस. बेंकटेश यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितलं की, दारू आठ जणांनी मिळून विकत घेतली आहे, परंतु पेमेंट मात्र एकाच जणाच्या कार्डद्वारे त्यांनी केलं. बेंगळूरु दक्षिणच्या अबकारी डीसी सदी एक गिरी यांनी सांगितलं की, आम्ही मालकाने सांगितल्या प्रमाणे चौकशी करत आहोत. दुकान मालक एस. बेंकटेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT