कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील अक्षय तृतीया सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण; बघा अंबाबाई लाईव्ह ॲपवरून

संभाजी गंडमाळे -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (Karveer niwasani shree Ambabai) मंदिरातील यंदाच्या अक्षय तृतीयेच्या (Akshay Tutiya) सोहळ्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. अक्षय तृतीयेला हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. पण, कोरोनामुळे मंदिरेच बंद असल्याने भाविकांच्या आग्रहाखातर सोहळ्याचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. समितीच्या अधिकृत अंबाबाई लाईव्ह ॲप व फेसबुक पेजवरून हे लाईव्ह होणार असून भाविकांनी घरातूनच हा सोहळा अनुभवावा, असे आवाहन समितीने केले आहे.

Live broadcast of Akshay Tritiya ceremony at Ambabai Temple kolhapur marathi news

दागिने खरेदी ऑनलाईन

दरम्यान साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया मुहुर्त आता केवळ ऑनलाईनच साधता येणार आहे. त्यासाठी काही सराफांनी तयारी केली आहे. मुहुर्तावर केवळ बुकींग करता येणार आहे. डिलिव्हरी मात्र लॉकडाऊन संपल्यानंतरच दिली जाणार आहे.

बुकींगवेळीच त्याचा दर निश्‍चित केला असून त्याचे बिल ही उद्याचेच होणार असल्याचे सराफांनी सांगितले. ज्या ग्राहकांना मुहुर्त साधायचा आहे, त्यांच्यासाठी सोन्याचे दागिणे ऑनलाईन दाखविण्याची व्यवस्था सराफ दुकानदांनी केली आहे. तसेच त्याचे बील तातडीने होणार असले तरीही डिलिव्हरीची तारीख लॉकडाऊन नंतरची असणार आहे. काही सराफ पेढ्यांवर आज काही ग्राहकांनी सोने बुकींग केले. मात्र अशी खरेदी करणारे ग्राहक हे केवळ ५ ते १० टक्के असल्यामुळे हा मुहुर्त साधता येणार नसल्याचे सराफ व्यापाऱयांचे मत आहे.

Live broadcast of Akshay Tritiya ceremony at Ambabai Temple kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT