Lockdown also prevents superstition in belgum 
कोल्हापूर

करणीचा फेरा कोरोनाने रोखला... नेमकं घडलं तरी काय...?

नागेंद्र गवंडी

बेळगाव - नेहमी करणीच्या उताऱ्यांच्या विळख्यात सापडणाऱ्या रस्त्यावरील कित्येक चौकांनी, गल्लीतील कोपऱ्यांना सुटका मिळाली आहे. याला कारण सध्या सुरू असलेले लॉक डाऊन आहे. परिणामी अंधश्रध्देलाही कोरोनाने रोखले आहे. तर अंधश्रध्देला बळी पडलेल्यांनाही स्वतःहून त्यातून बाहेर पडण्याची एक संधी निर्माण झाली आहे.

दर महिन्याच्या अमावास्या आणि पौर्णिमेला शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी लिंबू, लालकपड्यांमध्ये बांधून टाकण्यात आलेला नारळ, कोवाळा त्यासोबत इतर साहित्य टाकण्यात येते. अनेकदा बकऱ्यांचे डोके टाकल्याचे आढळून आले आहे. हा अंधश्रध्देचा प्रकार अधिक आहे. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सगळीकडेच लॉक डाऊन सुरू आहे. या लॉक डाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांना पोलिसांकडून चांगलाच प्रसाद मिळत आहे. तर अनेकांना कोरोनाला विषाणूची लागन होण्याची भिती असल्यामुळे घराबाहेर पडून अन्य कोणत्या व्यक्तीच्या जवळ जाणेही मुश्‍किल झाले आहे. तर कोणत्याही व्यक्तीला जवळ घेणेही मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे अंगामध्ये देव येणाचा समज असलेल्या व्यक्तीलाही आता कोरोनाची भिती निर्माण झाली आहे. परिणामी कोणाला उताऱ्याचा सल्ला देण्यासाठीही बोलावणे अधिक धोक्‍याचे त्यांना वाटत आहे. 

घराबाहेर न पडणे आणि कोणाला घरात न बोलाविणे ही भूमिका घेऊन सर्वच जण घरात बसून आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरात शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर तसले साहित्य आढळून आलेले नाही. अन्यथा प्रत्येक अमावास्याला प्रत्येक चौकात किरणीचे साहित्याचे ढीग आढळून येत होते. मात्र, लॉक डाऊनमुळे रस्त्यावरील प्रत्येक चौकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. तर या अंधश्रध्देतून स्वतःला बाहेर पडण्याची संधीही कोरोनाने समाजातील लोकांनी दिली आहे.

अंधश्रध्देच्या विळख्यात अनेक लोक अडकले आहेत. पण, या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मिळालेले लॉक डाऊन अधिक महत्वाचे ठरले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक प्रकारची पुस्तक वाचनाची आवड लावून घेतली पाहिजे. तर आपले मन एकाग्र करण्यासाठी योगा करण्याची सवय लावून घेता येते. सध्या या अंधश्रध्देतून बाहेर पडण्यासाठी लोकांना एक चांगली संधी मिळाली असून याचा लोकांना वापर करावा.

राहूल पाटील - सदस्य अंधश्रध्दा निर्मूलन समिती, बेळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

SCROLL FOR NEXT