The lockdown in Belgaum has been relaxed soon 
कोल्हापूर

बेळगावातील लॉकडाऊन अंतश: शिथिल करण्यात आला आहे पण...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - मे 3 रोजी लॉकडाउन उठविण्यात येणार असला तरी गुरुवार (ता.23) पासून लॉकडाउन अंतश: शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा काही प्रमाणात रिलॅक्‍स झाल्याचे पहावयास मिळत आहे. आज सकाळ पासून शहरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. तसेच वाहन चालकांची अडवणूक देखील करण्यात येत नव्हती. मात्र, ही सुट कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या निर्बंधित प्रदेशात (कंटेन्मेंट झोन) राहणार नाही.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवार पासून लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्याची घोषणा केली होती. मात्र, जनतेतून विरोध झाल्यामुळे त्याच दिवशी रात्री त्यांनी आदेश मागे घेतला होता. मागील तीन दिवसात इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात कोरोना बाधीत रुग्ण कमी आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गसुचीप्रमाणे राज्यात लॉकडाउनमध्ये नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागरिकांनी सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 43 जणांना कारोनाची लागण झाली आहे. तर हिरेबागेवाडी येथील एका वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तीघा जणांना डिश्‍चार्ज देण्यात आले असले तरी कॉरन्टांइन करण्यात आलेल्यांची संख्या देखील अधिक आहे. बहुतांश जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून कॉरन्टांईन करण्यात आलेल्यांना हॉटेल्स आणि लॉजमध्ये ठेवण्यात आले आहे.

लॉकडाउनला होउन महिन्याचा कालावधी झाला असून काही ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारेपठेतील घाउन दुकाने आजपासून सायंकाळी सहा वाजता सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल्स, ढाबे, दुध विक्री, गॅरेज, कृषी बाजारपेठ सुरु करण्यास सरकारने सहमती दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील रस्त्यावर काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ पहावयास मिळाली. पण, ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत. त्याठिकाणी मात्र, बंद कायम राहणार आहे.

मे 3 पर्यंत लॉकडाउन कायम असून सरकारने लॉकडाउनमध्ये आजपासून अंशत: शिथिलता दिली आहे. मात्र, शहरातील पोलीस बंदोबस्त कायम असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर राखण्याबरोबरच मास्क सक्‍तीने वापरावा. -

बी. एस. लोकेशकुमार, पोलीस आयुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT