lockdown effect on ichalkaranji city 
कोल्हापूर

लॉकडाउनमुळे वस्त्रनगरीवर परत झाला `हा` परीणाम..

पंडीत कोंडकर

इचलकरंजी - लॉकडाउनमुळे शहरातील 75 टक्के यंत्रमागांची पुन्हा धडधड थांबली आहे. प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करीत फक्त 25 टक्के यंत्रमाग सुरू झाले आहेत. मंदीमुळे अडचणीतून जात असलेल्या यंत्रमाग उद्योगाची कोरोनामुळे आणखी फरफट सुरूच आहे. त्यामुळे या उद्योगात सध्या अस्वस्थता आहे.


दोन-तीन वर्षांपासून यंत्रमाग उद्योग अडचणीत जात आहे. विविध प्रश्‍न उद्योगासमोर आहेत. त्यातून मार्गक्रमण करीत उद्योगाची वाटचाल सुरू आहे. अनेकवेळा उद्योजकांना फटका सहन करावा लागला आहे. आज ना उद्या उद्योग सुरळीत होईल, या आशेवर यंत्रमाग उद्योजक धडपडत आहेत, पण कोरोनामुळे उद्योजक आणखी अडचणीत येताना दिसत आहेत. अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परतले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकांनी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा फारसा संसर्ग नसल्यामुळे यंत्रमाग उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होता, मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यंत्रमाग उद्योगाला जबरदस्त फटका बसत आहे.


शहरात सर्वत्र कंटेन्मेंट झोन झाले आहेत. त्यामुळे अनेकांना यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी करण्याची मागणी यंत्रमाग उद्योगातून केली आहे, पण अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी झाला, तर अनेक यंत्रमाग उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, मात्र हे कारखाने सुरू करताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याचाही दक्षता घेणे पूर्वानुभव पाहता अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग शहरातील सर्वच भागांत पसरत आहे. त्यामुळे आता धोकाही वाढत चालला आहे.


दरम्यान, संसर्ग वाढत असताना स्थानिक नियंत्रण समितीने सात दिवस लॉकडाउन जाहीर केले. या काळातही यंत्रमाग उद्योग बंद ठेवला. त्यांनतर पुन्हा यंत्रमाग उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पुन्हा जिल्हा पातळीवरून सात दिवसांचा 100 टक्के लॉकडाउन जाहीर केला. त्याला आजपासून सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने यंत्रमाग उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे, पण केवळ 25 टक्केच यंत्रमाग सुरू झाले आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातही यंत्रमाग उद्योग बंद ठेवले आहेत. जेथे कामगारांची निवासाची व्यवस्था आहे, असे यंत्रमाग उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये ऑटोलूम कारखान्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय काही खर्चीवाले यंत्रमागधारकांनीही कारखाने सुरू केले आहेत, पण 75 टक्के यंत्रमागांची धडधड लॉकडाउनमुळे तूर्तास तरी थांबली आहे.

 
यंत्रमाग उद्योग दृष्टिक्षेप

साधे माग - 1 लाख
ऑटोलूम - 20 हजार
एकूण कामगार - 60 हजार
सध्या कार्यरत कामगार - 25 हजार

संपादन - अमरसिंह घोरपडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT