lockdown effect on tax department 60 crore tax not received in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरात वाहतूक बंदीचा असाही परिणाम; 60 कोटींवर फिरले पाणी

शिवाजी यादव

कोल्हापूर : लॉकडाउनच्या काळात खासगी प्रवासी वाहतूक बंद राहिली. परिणामी परिवहन विभागाला किमान अंदाजे ६० कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्रातील पाच हजारांवर लोकांचा घास हिरावला गेला आहे. दोन्ही बाजूला होणारा हा तोटा पाहता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेत का होईना खासगी प्रवासी वाहतूक तातडीने सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लॉकडाउनमुळे तीन आसनी, सहा आसनी रिक्षा तसेच खासगी आराम बस प्रवासी वाहतूकही बंद आहे. एसटी महामंडळाची वाहतूक सुरू झाली आहे. खासगी आराम बस प्रवासी वाहतूक बंद असल्याने कर थांबला आहे. कोल्हापुरातून पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड मार्गावर जवळपास ३०० हून अधिक खासगी आराम बस प्रवासी वाहतूक करतात. आराम बस बंद आहेत. नवीन वाहन नोंदणी तुलनेने कमी आहे. त्यामुळे जवळपास महिन्याला वीस कोटींचा कर भरला गेलेला नाही. चार महिन्यांतील बुडालेल्या करांचा आकडा एकूण ६० कोटींच्या घरात गेला आहे.

खासगी आराम बस संघटनेचे अध्यक्ष सतीश्‍चंद्र कांबळे म्हणाले, ‘‘दळणवळण सुरू राहिले तर शासनाला कर व लोकांच्या जगण्याला हातभार लागतो. कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने जगण्याचे चक्रच थांबले आहे. एका बससाठी २० लाख ते १ कोटीचे कर्ज  आहे. त्याचे हप्ते भरण्यास सूट असली तरी ते भरावेच लागणार आहेत. चिंता,  भूक, भविष्याचे प्रश्‍न अशा तिहेरी संकाटांशी सामना आराम बसमालकांना करावा लागतो. पर्याय म्हणून प्रवासी वाहतूक सुरू होणेच गरजेचे आहे.’’

दृष्टिक्षेपात

राज्यात ६० हजार आराम बस
पाच लाख लोकांना रोजगार
हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये खासगी बसना परवानगी 
पंजाब, हिमाचलमध्ये सहा महिन्यांचा कर माफ 
गुजरात व मध्य प्रदेशात ऑक्‍टोबरपर्यंत कर माफ

"खासगी आराम बस वाहतूक बंद आहे. नवीन वाहन नोंदणी तुरळक आहे. त्यामुळे लॉकडाउनमधील मे जून महिन्यात सरासरी तीन कोटी जेमतेम महसूल जमा झाला आहे. महिन्याला सरासरी २० कोटी महसूल मिळत असतो. दोन महिन्यांत अंदाजे ४० कोटींचा महसूल बुडाला आहे."

- डॉ. स्टिव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT