lockdown impact in fraued identify use people in ichlkarnji kolhapur marathi news 
कोल्हापूर

फ्रॉड ओळखपत्राचा वाढला सुळसुळाट ; कोण काय करतंय म्हणत वावरतात बिनधास्त.....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात लॉक डाऊन असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना रस्त्यावर वावरणे सहजसोपे राहिलेले नाही. त्यामुळे यातून पळवाट म्हणून कांही नागरीक बनावट अथवा कालबाह्य झालेल्या ओळखपत्रांचा वापर करुन शहरात बिनधिक्कतपणे वावरत आहेत. इतकेच नव्हे तर औषध व अत्यावश्यक सेवा असे फलक लावून प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळे लॉक डाऊनच्या कालावधीत शहरातील रस्त्यावर नाहक वर्दळ वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन पातळीवरुन विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यासाठी लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळच्या सत्रात लॉक डाऊन शिथील करण्यात आले आहे. पण नाहक दुचाकी घेवून रस्त्यावर येणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच दिवसभरात नाहक रस्त्यावर दिसल्यास गुन्हा दाखल करण्यात आहे. पण या कारवाईपासून बचाव करण्यासाठी बनावट अथवा कालबाह्य ओळखपत्राचा वापर केला जात आहे.

कोण कारवाई करीत नाहीत म्हणत

गळ्यात ओळखपत्र अडकले की कोण कारवाई करीत नाहीत, असा समज पसरला आहे. त्यामुळे अगदी कालबाह्य झालेली ओळखपत्रे देखील गळ्यात घालून फिरणार्‍यांची संख्या वाढली आहे. यामध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. माध्यम प्रतिनिधींना लॉक डाऊनमधून वगळण्यात आले आहे. त्याचाही गैरफायदा घेण्यास कांहीजणांनी सुरुवात झाली आहे. माध्यमांशी किंचतही संबंध नसलेले अनेकजण पोलीस यंत्रणेसमोर रुबाबात फिरत आहेत. अत्यावश्यक सेवा असे फलक लावून अनेक वाहने फिरतांना दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र कांही अंशी या माध्यमातूनही प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचे दिसत आहे.


पेट्रोल पंपावर होतोय गैरवापर
सध्या पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल दिले जात आहे. अशावेळी बनावट ओळखपत्रांचा सर्रास वापर करुन वाहनांमध्ये पेट्रोल भरुन घेतले जात आहे. यातून वरकमाई देखील केली जात असल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT