in lockdown period homemade sparrow nest give to a people in kolhapur 
कोल्हापूर

दारात चिमण्या गर्दी करायच्या, अंगणात टाकलेले धान्य चोचीने उचलायच्या; मग अवलियाने लढविली 'अशी' शक्कल

नंदिनी नरेवाडी

सानेगुरूजी वसाहत (कोल्हापूर) : अंगणात लावलेल्या झाडांवर एखादा पक्षी येऊन काही क्षण का, होईना बसला, की अनेकांना मनस्वी आनंद होतो. त्याच्यासाठी धान्य टाकणे, पिण्यास पाणी ठेवणे अशा गोष्टीही अनेकजण करतात. यापैकीच देवकर पाणंद येथील सतीश मनोहर कोळसे पाटील. त्यांना पक्ष्यांविषयी जिव्हाळा. यातूनच त्यांनी अंगणात पक्षी यावेत, यासाठी विविध प्रयोग राबविले.

सध्याही त्यांनी लॉकडाऊन काळात घरच्या घरी शंभर चिमण्यांची घरटी तयार केली असून परिसरातील नागरिकांना ही घरटी येत्या काळात देणार आहेत. त्यातून चिमण्यांचा अधिवास परिसरात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही वर्षापूर्वी त्यांच्या दारात चिमण्या गर्दी करायच्या. अंगणात टाकलेले धान्य चोचीने उचलायच्या आणि पुन्हा उडून जायच्या. मात्र काही वर्षात चिमण्या येईनाश्‍या झाल्या.

रोज दारात येणाऱ्या चिमण्या का येत नसाव्यात, असा प्रश्‍न त्यांना सतत सतावू लागला. यातूनच त्यांच्यासाठी घरटे तयार केले तर त्या येथेच राहतील. या विचाराने त्यांनी घरात चिमण्यांसाठी घरटी तयार केली. अंगणात पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ही घरटी ठेवली. काहीच दिवसांत अंगणात चिमण्यांचा किलबिलाट अंगणात वाढला. याच त्यांच्या अनुभवातून त्यांनी आणखी घरटी तयार केली. या घरट्यांचे मोफत वाटप ते करणार आहेत. 

झांडांचेही संवर्धन

चिमण्यांसह इतर पक्ष्यांचेही संवर्धन व्हावे, यासाठी  कोळसे पाटील यांनी देवकर पाणंद येथील बीएसएनएल परिसरातल्या मोकळ्या जागेत शंभर झाडे लावली. गेल्य चार वर्षात या झाडांचे जतनही त्यांनी केले आहे.

"वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास जवळजवळ संपुष्टात आला आहे. त्यांचे सवंर्धन व्हावे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. सध्या तयार केलेली शंभर घरटी मी परिसरात मोफत वाटणार आहे."

- सतीश कोळसे- पाटील 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT