Lockup facility few police stations crime rate rise kolhapur  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : ‘लॉकअप’विना पोलिसांची तारांबळ

जिल्ह्यात आठ ठिकाणीच सुविधा ; वेळ, श्रमाबरोबरच सुरक्षिततेचाही प्रश्न

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील मोजक्याच पोलिस ठाण्यांत ‘लॉकअप’ची सुविधा उपलब्ध आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांना सुरक्षित लॉकअप मिळवताना पोलिसांना कसरत करावी लागते. यात त्यांचे श्रम व वेळ खर्च होतो. शहरासह जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. कायदा सुव्यवस्थेसह गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पोलिस ठाण्यांची संख्या वाढली. आज जिल्ह्यात ३१ पोलिस ठाणी आहेत. पण त्यापैकी आठच ठाण्यांत लॉकअपची सुविधा आहे.

पोलिस गुन्ह्यांच्या तपासात संशयितांना ताब्यात घेतात. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना पुरावे गोळा करायचे असतात. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागते. त्यांना न्यायालयात हजर करावे लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने संशयिताला लॉकअपमध्ये ठेवावे लागते. ते लॉकअप संबंधित पोलिस ठाण्यात असेल, तर प्रश्नच मिटतो. पण ठाण्यात लॉकअप नसेल तर पोलिसांची तारांबळ उडते. अटकेची कारवाई केल्याबरोबर त्यांच्याकडून जवळच्या पोलिस ठाण्यात लॉकअपची शोधाशोध सुरू होते. ‘अमूक पोलिस ठाण्यातून बोलतोय, गुन्ह्यातील दोन-चार संशयित आहेत. तुमच्या लॉकअपला पाठवतो.’ अशी फोनवरून त्यांच्याकडून विचारणा सुरू होते. मात्र, समोरून ‘आधीच आमचे लॉकअप फुल्ल आहे.’ असे उत्तर आले तर आणखी अडचणी वाढतात. त्यांना पुन्हा दुसऱ्या जवळच्या लॉकअप असलेल्या पोलिस ठाण्याचा पर्याय शोधावा लागतो.

शहर परिसरात राजारामपुरी व गांधीनगर या दोनच पोलिस ठाण्यांत लॉकअप सुविधा आहे. दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये संशयितांना ठेवणे, त्याना पुन्हा ठाण्यात आणून चौकशी करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, न्यायालयात हजर करणे आदी गोष्टी करताना वेळ, श्रम, वाहतूक खर्चासह सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यात सुरक्षित लॉकअपची सुविधा गरजेची बनली आहे.

आठ ठाण्यांत सोय

जिल्ह्यातील आठ पोलिस ठाण्यांत लॉकअपची सुविधा आहे. शहरातील राजारामपुरीसह गांधीनगर, इचलकरंजी, शाहूवाडी, जयसिंगपूर, कागल, शिरोळ, चंदगड आदी पोलिस ठाण्यांचा यात समावेश आहे.

दृष्टिक्षेपात...

  • जिल्ह्यातील पोलिस ठाणी ३१

  • पोलिस अधिकारी १५९

  • पोलिस कर्मचारी २७६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT