Kolhapur Loksabha Election
Kolhapur Loksabha Election esakal
कोल्हापूर

Kolhapur : महाडिक कुटुंबातील 'ही' व्यक्ती लोकसभा लढवणार? समरजित घाटगेंचंही नाव आघाडीवर; मुश्रीफांची भूमिका ठरणार निर्णायक

ओंकार धर्माधिकारी

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणूक (Kolhapur Loksabha Election) ‘कमळ’ चिन्हावर लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला असून वेगवेगळ्या सर्वेक्षणातून नागरिकांची मते जाणून घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपचा उमेदवार नेमका कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. ज्या मतदारसंघात भाजपने कधीच लोकसभेची निवडणूक लढवली नाही, पण तेथे भाजपला सकारात्मक वातावरण आहे, अशा देशभरातील लोकसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण केले. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) १६ मतदारसंघ आहेत.

यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. अशा मतदारसंघाची जबाबदारी काही केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली. त्यातूनच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आतापर्यंत तीन वेळा जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावलीच, पण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नुकत्याच झालेल्या दौऱ्यात विधानसभानिहाय कार्यकर्ता मेळावे घेतले. त्यामुळे येथे भाजप लोकसभा निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून भाजप कार्यकर्त्यांनीही त्याची मागणी केली आहे.

२०१९ साली भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर दक्षिण, चंदगड या दोन मतदारसंघांत ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. तर कागलमध्ये अपक्ष निवडणूक लढलेले समरजितसिंह घाटगे हे भाजपमध्ये आहेत. या सर्व मतदारसंघांत भाजपच्या वाट्याला आलेल्या मतांची बेरीज दोन लाखांपर्यंत जाते.

तर कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेली मते विचारात घेता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची सुमारे अडीच ते तीन लाख मते असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेसाठी ‘कमळ’ चिन्हावर उमेदवाराची मागणी केली आहे. पक्षानेही कोल्हापूर लोकसभेवर विशेष लक्ष दिले असून त्या अनुषंगाने नेत्यांचे दौरे, बैठका सुरू आहेत.

उमेदवार कोण असणार?

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची नावे आघाडीवर आहेत. तर खासदार धनंजय महाडिक स्वत: लोकसभा निवडणूक लढवतील अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षाने आदेश दिला तर महाडिक कुटुंबातील व्यक्तीही लोकसभा लढवेल, असे सूतोवाच खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहेच.

मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सध्या महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे जर लोकसभा निवडणूक महायुती म्हणून लढली गेली तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यादृष्टीनेही राजकीय समीकरणांची मांडणी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT