Loksabha Election Sharad Pawar esakal
कोल्हापूर

Kolhapur Loksabha : कोल्हापूर-हातकणंगले कोणाला? पवारांच्या उपस्थितीत 'MVA'ची खलबते; जागा वाटपासह उमेदवारी निश्‍चितीची शक्यता!

महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक असे काँग्रेसचे चार आमदार आहेत.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (ता. २०) महाविकास आघाडीची खलबते होण्याची शक्यता आहे. यात जागा कोणत्या पक्षाला घ्यायची इथपासून ते संभाव्य उमेदवार कोण असतील यावर चर्चा शक्य आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी श्री. पवार आज (ता. २०) कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासह या कार्यक्रमाला खासदार डी. राजा, भालचंद्र कांगो, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातही उपस्थित रहाणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा समावेश आहे.

गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून खासदार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने विजयी झाले होते. सध्‍या हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आहेत. त्यामुळे या तिन्हीही पक्षांना नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी जागा कोणाला याची निश्‍चिती व्हायला हवी. सद्यस्थितीत दोन्ही जागांवर ठाकरे गटाकडून दावा सांगितला जात असला तरी त्यांच्याकडे दोन्ही मतदारसंघात ताकदीचा उमेदवार नाही. अशीच स्थिती राष्ट्रवादी व काँग्रेसची आहे.

पण, जिल्ह्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक असे काँग्रेसचे चार आमदार आहेत. याशिवाय स्वतः सतेज पाटील व प्रा. जयंत आसगावकर काँग्रेसचे विधान परिषद आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम आहे. त्यातून दोनपैकी एक जागा काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता आहे. त्यातही कोल्हापूरमधून काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याने हाच मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. स्मारक लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघाचे वाटप व संभाव्य उमेदवारांच्या नावांवर या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे. तशी तयारी त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरू आहे.

डिनर डिप्लोमसी

आज (ता.२०) रात्री कॉ. गोविंद पानसरे स्मारक लोकार्पण कार्यक्रमानंतर आमदार सतेज पाटील यांच्या घरी श्री. पवार यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आहे. याचठिकाणी जागा वाटप, उमेदवारीवर चर्चा शक्य आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी ९ वाजता श्री. पवार पुण्याला रवाना होणार आहेत, त्यामुळे आजच यावर चर्चा अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT