Loss Of Sugarcane In An Area Of O​ne Thousand Hectares Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सोसाट्याच्या वाऱ्याने एक हजार हेक्‍टर क्षेत्रातील ऊस भुईसपाट

अवधूत पाटील

गडहिंग्लज : मुसळधार पावसाने ऊस भुईसपाट झाला आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात सुमारे एक हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण क्षेत्राच्या हे जवळपास 10 टक्के क्षेत्र आहे. ऊस पडल्याने उत्पादनात किमान 15 ते 20 टक्के घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत आणखी भरच पडली आहे. 

गडहिंग्लज तालुक्‍यात नऊ हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर ऊस आहे. चित्री प्रकल्पामुळे हिरण्यकेशी नदी बारमाही वाहते. या मुबलक पाण्यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचाही उसाकडेच कल आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बऱ्यापैकी उसावरच अवलंबून आहे.

यंदा वळवाचा झालेला चांगला पाऊस आणि पोषक हवामानामुळे उसाची वाढ चांगली झाली आहे. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पहिल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झालाच; पण त्यासोबत सोसाट्याचा वाराही होता. या वाऱ्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. सुमारे एक हजार हेक्‍टरवरील ऊस भुईसपाट केला आहे. 

ऊस एकदा पडला, की त्याची म्हणावी तशी वाढ होत नाही. खोडव्यापेक्षा लावणीचा ऊस अधिक पडल्याचे दिसून येत आहे. पडलेल्या उसाचे डोळे जमिनीला टेकल्यामुळे त्याला फुटवा येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. शिवाय उंदरांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळेही उत्पादनात घट येऊ शकते. पडलेल्या उसात जाता येत नाही. त्यामुळे पाणी पाजणे, खते टाकण्यास अडचणी येतात. या साऱ्याचा परिणाम वाढ खुंटण्यावर आणि त्यातून उत्पादन घटण्यावर होतो. 

तोडणीलाही येणार अडचणी... 
आता ऊस पडला आणि प्रश्‍न संपला असे होत नाही. त्याच्या तोडणीपर्यंत अडचणी कायम असतात. कारण, तोडणी मजूर पडलेला ऊस तोडण्यास तयार नसतात. साहजिकच अशा उसाची तोडणी उशिरा होते. शिवाय मजुरांकडून ऊस तोडणीसाठी अन्य उसाच्या तुलनेत जादा रकमेची मागणी केली जाते. आधीच उत्पादन घटलेले असताना पुन्हा शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो. 

उत्पन्न कमी होणार
यंदा ऊस चांगला आला होता; पण वाऱ्यामुळे 28 गुंठ्यावरील ऊस पडला आहे. पाऊस जास्त झाला तर फार फरक पडत नाही; पण वाऱ्याने नुकसान केले आहे. पडलेल्या उसाला मूळ सुटणे, उंदीर लागण्याचे प्रकार होतात. त्यामुळे उत्पन्न कमी होणार आहे. 
- अशोक पाटील, शेतकरी, हरळी बुद्रुक, ता. गडहिंग्लज 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT