Political  esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात पुन्हा 'आमचं ठरलंय'ची सोशल मीडियावर चर्चा

पाटील विरुध्‍द महाडिक असा सामना असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटील विरुध्‍द महाडिक असा सामना असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्‍हा एकदा पालकमंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडिक आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडीकडून मंत्री पाटील व भाजपकडून महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल रिंगणात उतरले आहेत. पाटील विरुध्‍द महाडिक असा सामना असल्याने चुरस निर्माण झाली आहे. जाहीर प्रचार, टिकाटिप्‍पणी, सभा नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र दोन्‍ही गटांचे कार्यकर्ते भिडल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार महाडिक समर्थकांनी केला आहे, तर ‘आमचं ठरलंय विधान परिषद उरलंय’ या ट्रेंडच्या माध्यमातून मंत्री पाटील यांचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत.

नेतेमंडळी, वैयक्तिक मतदारांना भेटून आपली बाजू भक्‍कम करत आहेत. नेते जरी शांत असले तरी दोन्‍ही गटांचे कार्यकर्ते मात्र अस्‍वस्‍थ आहेत. सभा, प्रचारातून आरोप, प्रत्यारोपाची संधी नसल्याने त्यांनी या कामासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत.

महाडिक गटाचे कार्यकर्ते २०१४ च्या निवडणुकीचा संदर्भ देत २० ते २२ दिवसांत पाटील यांच्या विरोधात मैदान मारल्याचा दाखला देत आहेत. तसेच ‘अमल जनतेचा, भावी आमदार,’ ‘२०१४ च्या इतिहासाची पुनरावृत्ती,’ ‘पुन्‍हा कमळ,’ ‘विधान परिषदेत अमल,’ ‘भावी आमदार,’ ‘२०१४ रिट‍न्‍स,’ ‘मिशन विधान परिषद,’ ‘अं हं महाडिकच,’.‘मिशन सुटटी नॉट, फक्‍त औपचारिकता बाकी विजय निश्‍चित अशा पध्‍दतीच्या पोस्‍टव्दारे वातावरण तापवण्याचा प्रयत्‍न करत आहेत.

मंत्री पाटील गटाचे कार्यकर्तेही जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत. पाटील गटाचा ‘आमचं ठरलंय हा ट्रेण्‍ड, तर राज्यात प्रसिध्‍द झाला आहे. त्याचा संदर्भ घेत आमचं ठरलंय’ विधान परिषद उरलंय, असा ट्रेण्‍ड चालवला जात आहे. ‘अं हं पाटीलच,’ ‘एकच साहेब बंटी साहेब,’ ‘पक्षनिष्‍ठा म्‍हणजे बंटी पाटील’ अशा पोस्‍ट, स्‍टेटस्‌व्दारे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT