kolhpaur esakal
कोल्हापूर

कोल्हापूर - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी निश्‍चित

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिलच्या ९२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिलच्या ९२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्वैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून छाननी प्रकियेनंतर निवडणूक अधिकारी सागर नागरे यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. अध्यक्षपदासाठी राज्यातून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे गांधी यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.

गांधी गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्य केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिलच्या ९२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गांधी यांच्या नेतृत्वाखालील दोन उपाध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिलवरील २७ सदस्य बिनविरोध झाले असून, व्यवस्थापन समितीच्या उर्वरित तीन जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत. गव्हर्निंग कौन्सिलच्या उर्वरित ६२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात आहेत. १५ नोव्हेंबर अर्ज माघारीची शेवटची तारीख असून, त्यानंतर उर्वरित जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उद्योजकांना प्रोत्साहन

उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १९२७ ला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरची स्थापना केली. राज्यातील ५५० हून अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजारांहून अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न आहे. ५५० संलग्न सभासदांच्या माध्यमातून चेंबर राज्यातील ७ लाख व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करत आहे.

"शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही दुर्मिळ घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषिपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहीन. महाराष्ट्राला देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाबरोबर कार्य करून यश मिळवेन."

- ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT