Mahatma Gandhi Jayanti Sanitation campaign Inspired by daily Sakal the cleaning campaign was strengthened 
कोल्हापूर

Video : कोल्हापुरातील एमआयडीसी झाल्या चकाचक

सकाळ वृत्तसेवा

नागाव (कोल्हापूर)  : महात्मा गांधी जयंतीनिमित्त औद्योगिक विकास महामंडळाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेस शिरोली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन व मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगलेमध्ये उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 
स्वच्छता मोहिमेमुळे औद्योगिक वसाहतींचा परिसर चकाचक झाला. औद्योगिक क्षेत्र नेहमीच स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक राहणे, हे तेथे काम करणाऱ्या कामगार व उद्योजकांच्या दृष्टीने गरजेचे आहे. दैनिक ‘सकाळ’ने दोन वर्षांपूर्वी पर्यावरण दिनानिमित्त 
 


औद्योगिक वसाहतींच्या अंतर्गत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. औद्योगिक विकास महामंडळाने याला सकारात्मक प्रतिसाद देत ही स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्याची जबाबदारी उचलली. त्यानुसारच औद्योगिक विकास महामंडळाने शिरोली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन व मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले या तिन्ही औद्योगिक संघटनांना ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत उद्योजकांनी कंपनीचे कामगार व कर्मचारी यांच्याकडून परिसरातील स्वच्छता करून सर्व कचरा एका ठिकाणी गोळा केला. औद्योगिक विकास महामंडळाने हा गोळा केलेला कचरा वाहून नेण्याची व्यवस्था केली होती.  ट्रॅक्‍टर ट्रॉलीच्या साहाय्याने हा कचरा वाहून नेण्यात आला. 

शिरोलीतील बंद कारखान्यांचे परिसरही कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ
 शिरोली एमआयडीसीत आज सकाळी साडेनऊच्या सुमारास श्रीराम फाउंड्री येथील मुख्य चौकात स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता आय. ए. नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम सुरू झाली. ‘एमआयडीसी’चे कनिष्ठ अभियंता नीलेश जाधव, कुमार इंगवले उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीतील ठराविक रस्ते महामंडळाने सफाई कर्मचाऱ्यांमार्फत दुतर्फा स्वच्छ केले आहेत. शिवाय, बंद उद्योगांसमोरील स्वच्छताही महामंडळामार्फतच करण्यात आली. 

गोकुळ शिरगाव ‘एमआयडीसी’त नियमित मोहीम राबविणार
 गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत व्यापक व नियमित स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी सांगितले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत स्वच्छता मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्व कारखान्यांमध्ये व कारखान्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. ‘गोशिमा’चे अध्यक्ष शिरगावकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मानद सचिव मोहन पंडितराव, खजिनदार नितीनचंद्र दळवाई, अजित आजरी, लक्ष्मीदास पटेल, रणजित पाटील, दीपक चोरगे, स्वरूप कदम, संजय देशिंगे, योगेश कुलकर्णी, शिवाजीराव सुतार, अमोल यादव, ‘एमआयडीसी’चे उपअभियंता आय. ए. नाईक, संस्थेचे सचिव कृष्णात सावंत उपस्थित होते.

पंचतारांकित वसाहतीत तिसऱ्या वर्षीही प्रतिसाद
 ‘सकाळ माध्यम समूहा’ने औद्योगिक वसाहतींमधील स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या मोहिमेला सलग तिसऱ्या वर्षी चांगले बळ मिळाले. आज सकाळी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत शेकडो हात स्वच्छतेसाठी सरसावले. सकाळी नऊला मॅक कार्यालयाच्या प्रांगणातून स्वच्छतेस सुरवात झाली. रेमंड चौक, फ्रॉस्टी चौक आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. फाईव्ह स्टार एमआयडीसीतील कंपन्यांनी कंपनी आवारात सकाळी नऊपासून मोहीम राबवली. स्वच्छतेविषयी जागृती झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ‘एमआयडीसी’चे प्रभारी कार्यकारी अभियंता सुभाष मोरे, उपअभियंता एस. व्ही. अपराज, कनिष्ठ अभियंता रोहित पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, उपाध्यक्ष संजय पेंडसे, संजय जोशी, हरिश्‍चंद्र धोत्रे, प्रताप परुळकर, विठ्ठल पाटील, सुरेश क्षीरसागर, सचिव शंतनू गायकवाड यांनी सहभाग घेतला.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT