mahavikas aghadi and the election of gram panchayat article of ajit madyale in gadhhinglaj kolhapur 
कोल्हापूर

‘महाविकास’ची चाके गावगाड्याला चालणार ? आघाडीतील समन्वयावर ठरणार समीकरणे

अजित माद्याळे

गडहिंग्लज (कोल्हापूर) : जिल्ह्यातील ४३३ गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान उडणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, पंचायत समित्या अशा मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्याचे अनुकरण होऊ शकते; परंतु थेट राज्यातील अशा तीन पक्षांच्या आघाडीची चाके गावगाड्याला ओढून नेतील का, हे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेलच. दुसऱ्या बाजूने विचार केला तर गावागावांत भाजपला एकाकी पाडण्यासाठी असा प्रयत्न बहुतांश गावांमध्ये होऊ शकतो, हेही नाकारून चालणार नाही.

जिल्हा परिषद, महापालिकेमध्ये भाजपला कट्ट्यावर बसवून अशा विविध चाकांचा प्रयोग याआधीच यशस्वी झाला आहे. आता जिल्ह्यातील ४३३ गावांच्या निवडणुकांत हा प्रयोग होणार का, या विषयावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीन चाकांचा समन्वय कामकाजात दिसून येत असला, तरी गावागावातील गावपुढारी आपापल्या नेत्यांचे अनुकरण करतील का, हा मुद्दा आव्हानाचा असला तरी तो तितका अवघडही नाही. 

गावगाडा हाकताना ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची आहे, यावर बरेच अवलंबून असते. गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर सत्तेची साखळी एक झाल्यास विकासात अडचण येत नाही असे एक समीकरण झाले आहे. गावात स्थानिक आघाड्यांना महत्त्व असते हे खरे; परंतु त्यात दुसरे-तिसरे कोणी नसतात, तर विविध विचारसरणीच्या राजकीय पक्षांचेच प्रतिनिधी असतात.

स्थानिक आघाडी करायला एकमत असते, तर महाविकास आघाडी करण्यास कोणती अडचण येईल असे वाटत नाही. यामुळे हा प्रयोग अनेक गावांत अमलात येऊन भाजपला जसे एकाकी पाडले आहे, तसेच गावातही त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तशा चर्चा काही प्रमुख गावांमध्ये सुरू झाल्याचेही सांगण्यात येते. महाविकास आघाडीमुळे इच्छुकांची पंचाईतही होणार आहे. गावपातळीवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असते. आघाडीच्या रचनेत अनेकांवर अन्याय होणार आहे. त्यातच भाऊबंदकीचा प्रश्‍नही संवेदनशील असतो. हे प्रश्‍न सोडवण्यात यश आल्यास आघाडी आकाराला येणे सोपे जाईल; मात्र त्यात कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

पक्षांतर्गत वाद अडचणीचा

गावागावांत विविध राजकीय पक्षांमध्ये दोन-दोन गट कार्यरत असतात. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ते अधिक उफाळून येतात. यातूनच स्थानिक आघाड्यांचा जन्म होत असतो. महाविकास पॅटर्न राबविताना हा प्रश्‍न अडचणीचा ठरणार आहे. उमेदवारी नाकारल्यावर बंडखोरीची भीतीही मोठी असते. नेत्यांनी लक्ष घालून प्रयत्न केल्यास ‘महाविकास’ला यश येईलही; परंतु गावांतर्गत राजकारणात न पडलेले बरे, अशा भूमिकेत असणारे नेते कितपत यासाठी रस दाखवितात, यावरच गावगाड्यात महाविकास पॅटर्नचे भवितव्य अवलंबून असेल.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT