Mahadeo Mahdik Satej Patil
Mahadeo Mahdik Satej Patil  Sakal
कोल्हापूर

Kolhapur : महादेव महाडिकांना मोठा धक्का; राजारामचे 1346 सभासद अपात्र

सकाळ डिजिटल टीम

Rajaram Sugar Factory News : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्राबाहेरील व बनावट एक हजार ३४६ सभासद अपात्र ठरविण्याचा प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांचा निर्णय आज उच्च न्यायालयाने कायम ठेवला. या निर्णयाने कारखान्यातील सत्तारूढ माजी आमदार महादेवराव महाडिक गटाला मोठा धक्का बसला असून, माजी मंत्री सतेज पाटील गटाची सरशी झाली आहे. या निर्णयाने कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला.

‘राजाराम’ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एक हजार ८९९ सभासदांच्या विरोधात कारखान्यातील विरोधी शाहू परिवर्तन आघाडीने हरकत घेतली होती. प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे यावर सुनावणी होऊन यातील ४८४ सभासद पात्र ठरविले होते. याशिवाय, दुबार व मृत मिळून ६९, तर बनावट १००८ व कार्यक्षेत्राबाहेरील ३३८ असे एक हजार ३४६ सभासद अपात्र ठरविण्यात आले होते. हा निर्णय १४ फेब्रुवारी २०२० ला देण्यात आला.

या निर्णयाविरोधात सत्तारूढ गटाने तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले होते; पण तेही फेटाळण्यात आल्यावर या निर्णयाविरोधात अपात्र सभासदांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयात दोन वर्षांपासून या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित होती. आज त्यावर न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने यापूर्वी प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांनी दिलेले आदेश कायम ठेवतानाच अपात्र सभासदांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या प्रकरणी विरोधी परिवर्तन आघाडीतर्फे अॅड.रवी कदम, अॅड. पी. डी. दळवी आणि ॲअॅड. केदार लाड यांनी काम पाहिले.

कारखान्यावर २८ वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. या विरोधात माजी मंत्री सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीत थोडक्या मतात श्री. पाटील यांचे पॅनेल पराभूत झाले. सध्या राज्यासह जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीविषयीही राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. या निर्णयाने सतेज पाटील गटाला मात्र उभारी मिळाली असून, महाडिक गट बॅकफूटवर गेला आहे.

कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठी आम्ही लढा देत होतो. आजच्या निर्णयाने सभासदांना न्याय मिळाला. बाहेरच्या जिल्ह्यांतील सभासदांविरोधात स्थानिक सभासदांनी हा लढा उभारला होता, त्यालाही यश आले असे सतेज पाटील यांनी सांगितले. तर, न्यायव्यवस्थेचा पूर्ण सन्मान राखून सर्व कायदेशीर बाबी पडताळून पुढील कार्यवाहीची दिशा ठरवू असे अमल महाडिक यांनी म्हटले आहे.

गाव आणि अपात्र सभासद खालीलप्रमाणे

शिरोली - ४०२, मौजे वडगाव ११९, लाटवडे ३९, टोप ७८, संभापूर १३, हेरले ३२, आळते ७, भेंडवडे ६२, लाटवडे ३९, भादोले ३३८, पेठवडगाव १६९, तासगाव २९, साखरी ५८,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT