Many fish species became extinct due to contaminants storyby amol savant 
कोल्हापूर

शिंगाडा, पानगा, खवली, कोळशी हे मासे दुर्मिळ होण्याची ही आहेत कारणे 

अमोल सावंत

कोल्हापूर  : पूर्वी नद्या, तलाव, झरे, अन्य ठिकाणी भरपूर मासे मिळत होते; पण आज अशी स्थिती नाही. अनेक प्रदूषित घटकांमुळे अनेक माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या. समुद्री माशांत जी सत्त्वे असतात, तीच सत्त्वे नदीच्या माशांतही असतात. कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये नदीच्या काही प्रजातीच विक्रीसाठी येतात. अलीकडे नदीत प्रदूषणामुळे नैसर्गिक माशांच्या पैदाशीवर परिणाम झाला आहे. नदीतून पालू जातीचा मासा विक्रीसाठी नव्यानेच येत आहे. 

नदीतील मासे दुर्मिळ होण्याची कारणे 
* मुबलक प्रजाती : रोहू, कटला, मिरगल, महसीर, काजूली, राणी मासा, वाम, वाघ मासा, सारंगा 
* धोक्‍यातील प्रजाती : वाघ मासा, नकटा, मिरगा, रोहू 
* मस्त्य शेतीतून काही माशांची बीजे, चायनीज, विदेशी मासे नदी प्रवाहात त्यामुळे मुळ प्रजाती नष्ट 
* तिलापिया, प्युन्टीस, गौरमी या विदेशी माशांची नदीपात्रात घुसखोरी 
* औद्योगिक रसायने, शेतीतील रासायनिक घटकांचे नदीत उत्सर्जन 
* सूक्ष्म अन्‌ मोठा प्लास्टिक कचरा 
* वैद्यकीय सांडपाण्याचा प्रवाह नदीत 
-मिरगा, रोहू, कटला माशांचे अस्तित्व धोक्‍यात 
-मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले 
-बंधाऱ्यामुळे प्रजननासाठी नदी मुखापर्यंत जाण्यास अडथडळा त्यामुळे पैदाशीवर परिणाम 
-ऑक्‍सिजन वाढविण्यासाठी नदी प्रवाहित ठेवण्याची गरज 
- सध्या मासेमारी करताना टिलाप, सिफरन, आंबळ्या जातींचे मासे सापडतात. 
काही माशांच्या जाती प्रदूषित पाण्यावरच जगत आहेत. 

तलावात अन्‌ नदीतील मासे 
तलावातील कटला, रोहू, मिरगल, सायप्रनस, ग्रासकार्प (गवत्या), सिल्व्हरकार्प (चंदेरी) तर नदीत मरळ, शिंगाडा, पानगा, खवली, कोळशी, भनगा, आळकुट, मळ्या, ओंबाट, तिलापिया आणि अलीकडे नवीन आलेला पालू मासा मिळत आहे. शिवाय नदीत वाम, वडुशी, दांडी, कोळशी, कडवी, तलीबीर, कानस, तांबटी, करला, मोरी, वाघा, वांझ, कटरना, शिंगटी, घोगऱ्या, मुंदवी, मंगेशा, करप्या, डोकऱ्या, पाणकूट अशाही जाती आहेत. पूर्वी वाडशी, अळकूट, वाम्बट, अहीर, महाशीर किंवा महाशीर/दख्खनचा महाशीर, म्हशीद, महाशीर शिवाय पराग, कोळशी, कानस, सांडशी, लांबकुंडी, तामटी या उपजाती तर मुल्या, मुळीचा, गन्ना, फसकूट, वाटाणी, नुकटा किंवा भोवरी हे दोन तोंडाचे मासे, वाघमासा, कालीवाम, बालशिवडा हे मांसभक्षी मासे तसेच कार्तीना, सींगल, शिंगटी, कुरडू, घोंगया मासेही मिळत असत. 

जिल्ह्यात जे जलस्त्रोत आहेत. त्यात स्थानिक माशांच्या प्रजाती मिळतात. प्रदूषणांमुळे अनेक प्रजाती नष्टही झाल्या आहेत. स्थानिक माशांच्या प्रजातींसाठी संवर्धन, संरक्षण करण्याची गरज आहे. तीन ते चार हजार भोई बांधवांना यापासून अर्थकारणाचा लाभ होतो. जलस्त्रोतांचे प्रदूषण न होण्यासाठी काळजी घ्यावी.'' 
-प्रा. एकनाथ काटकर  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT