Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Community esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : छगन भुजबळांविरुद्ध मराठा समाज आक्रमक; 'या' 6 कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी

खोटी विधाने करून भुजबळांनी समस्त मराठा समाजाचा अवमान केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भुजबळांच्या प्रक्षोभक विधानांमुळे मराठा तरुणांत असंतोष निर्माण झाला आहे.

कोल्हापूर : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर दखलपात्र गुन्हा करावा, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे (Lakshmipuri Police Station) पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांना येथे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. त्यात भुजबळ यांनी भाषणात मराठा समाज (Maratha Community) व इतर जातींत दुही माजवून राज्यात दंगली माजवण्याचा व अराजक पसरवण्याच्या उद्देशाने, मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोहचेल, असे वक्तव्य केले.

मनोज जरांगे-पाटील यांच्याबद्दल चुकीची, खोटी विधाने करून समस्त मराठा समाजाचा अवमान केला आहे. त्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे मराठा तरुणांत असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्याविरुद्ध दंगा घडवून आणण्यासाठी बेछूटपणे चिथावणी दिल्याबद्दल कलम १५३, निरनिराळ्या गटांत शत्रुत्व वाढविण्यासाठी कृती केल्याबद्दल कलम १५३ अ, जरांगे-पाटील यांची बदनामी केल्याबद्दल कलम ४११.

तसेच शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान केल्याबद्दल १०४, जाती-जातीत शत्रुत्व निर्माण करणारी विधाने केल्याबद्दल १०१, जरांगे-पाटील यांचा अपमान केल्याबद्दल २१५ ए अन्वये गुन्ह्यांची नोंद करून कायदेशीर कारवाई करावी.

ते विद्यमान मंत्री म्हणून व त्यांच्या या गुन्हेगारी कृत्याला शासनाचा पाठिंबा असल्याने, गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे गुन्हेगारी धाडस वाढले असून, ते कायद्याला जुमानत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. शिष्टमंडळात वसंतराव मुळीक, अॅड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, रविकिरण इंगवले, बाबा पार्टे, सुभाष जाधव यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Viral Video: देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी, साधेपणाचं झालं कौतूक, गावाकडचं प्रेम जपणारी अभिनेत्री

Latest Marathi News Update LIVE : अंबरनाथ नगरपालिकेच्या माहितीफलकावर गोंधळ! झाडू चिन्हाचा पक्षनावाविना उल्लेख

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

SCROLL FOR NEXT