Maratha youth in trouble due to cancellation of appointment 
कोल्हापूर

तरुणांना पुन्हा एकदा धक्का; नियुक्‍त्या रद्दमुळे मराठा तरुण अडचणीत

युवराज पाटील

कोल्हापूर : तरुणांसाठी आधारवड ठरलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ बरखास्त झाल्याने समाजातील तरुणांना पुन्हा एकदा धक्का बसला. पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरीत्या हातात छडी घेऊनच ज्या बॅंका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, त्यांना धडा शिकविला. मात्र, महामंडळावरील नियुक्‍त्या बरखास्त झाल्याने आपल्याला दारात तरी कोणी उभे करेल का, अशी भावना तरुणांत निर्माण झाली आहे. 

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर तरुणांत अस्वस्थता आहे. या प्रश्‍नावर आजही आंदोलने सुरू आहेत. या धक्‍क्‍यातून सावरण्यापूर्वीच शासनाने अण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्‍त्या रद्द केल्या. घाईगडबडीने घेतलेला निर्णय मराठा तरुणांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारा ठरेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तरुणांना उद्योग व्यवसायासाठी महामंडळातर्फे कर्ज दिले जाते, याची माहितीही कोणाला नव्हती. तत्कालीन युती सरकारने महामंडळाचे अध्यक्षपद माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्याकडे सोपवले.

उपाध्यक्षपद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे दिले. बहुतांशी सदस्य भारतीय जनता पक्षाला मानणारे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस व राष्ट्रवादीशी सूत जुळवून महाविकास आघाडीचे सरकार आणले. आता भाजपचे सदस्य ज्या महामंडळावर जादा संख्येने आहेत, त्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचाय प्रयत्न आहे.


वैयक्तिक कर्ज व्याज योजनेंतर्गत अर्जदारांची संख्या १ लाख ९८ हजार ७४ आहे. प्रत्यक्ष प्रमाणपत्र दिलेल्यांची संख्या ७१ हजार ३८४, तर बॅंकेने कर्ज मंजूर केलेल्या लाभार्थ्यांची संख्या १९ हजार ६०९ आहे. महामंडळाकडून व्याज परताव्यासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १७ हजार ३३५ आहे. आजपर्यंत बॅंकांनी १२ अब्ज १७ कोटी ३१ लाख १७ हजार १८७ व्याज परतावा झालेली रक्कम आजअखेर मंजूर केली आहे. आजपर्यंत परतावा झालेली रक्कम ७० कोटी ६५ लाख ३९ हजार ७८२ आहे. कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत परतावा झालेली रक्कम २८ कोटी ६० लाख १०३, तर प्रकल्प योजनेंतर्गत अर्ज दिलेल्या एफपीओ गटाची संख्या ३३१ इतकी आहे. 

नियुक्ती रद्द झाली तरी प्रशासकीय कामकाज सुरू राहील. त्यामुळे कोणीही मराठा तरुणांना वेठीस धरू नये. बॅंकांचे खूप चांगले सहकार्य मिळाले आहे. कोणत्याही लाभार्थ्यास अर्थसाह्य देण्यात टाळाटाळ होत आहे, असे वाटत असल्यास त्याने संपर्क साधावा. 
- संजय पवार, (मावळते उपाध्यक्ष)

मराठा तरुणांना उद्योजक बनण्याची संधी महामंडळामुळे मिळाली. मागच्या सरकारच्या काळात महामंडळाचे चांगले काम चालले होते. म्हणूनच त्यांना मुदतवाढ दिली होती. २५ हजारहून अधिक युवकांना कर्ज उपलब्ध करण्यात अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पाठपुरावा केला.. 
- वसंत मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

वैयक्तिक कर्ज
९१५२
प्रमाणपत्र पात्र
६०७८
कर्ज मंजूर लाभार्थी
१५२२
व्याजपरतावा पात्र
१४२३
वितरित कर्ज रक्कम
११७ कोटी १२ लाख ८१ हजार ३२७ 
आजपर्यंत व्याज परतावा 
७७७ कोटी ६३ लाख ३२८ हजार 
गटकर्ज परतावा
७ लाख २४ हजार ७०२
प्रकल्प कर्ज एफपीओ गट
१६

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT