married man married again one women with illegal but relatives beating to this man in belgaum 
कोल्हापूर

चक्क वधुवरानेच काढला लग्नातून पळ ; वराची झाली चांगलीच धुलाई

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट न देताच दुसरे लग्न करून घेणाऱ्याला मंगळवारी (१३) उपनोंदणी कार्यालयाच्या आवारातच चोप देण्यात आला. पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी त्या नवरदेवाची धुलाई केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. त्यामुळे नोंदणी पद्धतीने दुसरे लग्न करून घेण्यासाठी आलेल्या नवरदेवाला व त्याच्या वाग्दत्त वधूला तेथून पळ काढावा लागला.

गेल्या आठवड्यातही उपनोंदणी कार्यालयात एक वादावादीचा प्रकार घडला होता. एका जागेच्या खरेदी-विक्री व्यवहारात कमिशन व हप्ता देण्यावरून उपनोंदणी अधिकाऱ्यासमोरच वाद झाला होता. त्यानंतर संबंधित एजंटाची त्याच्या कार्यालयाकडे जाऊन धुलाई करण्यात आली होती. हा प्रकार कळल्यानंतर संबंधित उपनोंदणी अधिकाऱ्यानेही कार्यालयातून काढता पाय घेतला होता. आता आठवडाभरात हाणामारीचा दुसरा प्रकार घडला आहे. यावेळी उपनोंदणी कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला आहे.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी तेथे वाग्दत्त वर व वधू आले होते. साक्षीदार म्हणून काहीजण त्यांच्यासोबत कार्यालयाच्या परिसरात उपस्थित होते. नोंदणी विवाह होण्याआधीच संबंधित व्यक्तीच्या पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाली. त्यांनी थेट उपनोंदणी कार्यालय गाठून त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपनोंदणी कार्यालयाच्या परिसरात गोंधळ उडाला.

कोण कोणाला मारतंय यासह हाणामारीमागचे कारणही कळत नव्हते. संभाव्य धोका ओळखून विवाह नोंदणी न करताच संबंधितांनी तेथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर तेथे उपस्थित असलेल्यांना नेमका प्रकार कळला. बेळगावचे उपनोंदणी कार्यालय गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पण आता गेल्या आठवडाभरात दोनवेळा हाणामारीमुळे कार्यालय चर्चेत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Marathi Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, २० बंधारे पाण्याखाली; पंचगंगा धोक्याच्या दिशेने, प्रशासन सतर्क

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

SCROLL FOR NEXT