mask made from silver in kolhapur for marriage ceremony 
कोल्हापूर

विषयच हार्ड ! नवरा - नवरीसाठी कोल्हापुरात तयार झाला चांदीचा मास्क... किती आहे त्याची किंमत वाचा...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. ऐन लग्नसराईतील या लॉकडाऊनमुळे लग्ने लांबणीवर पडली होती. काही दिवसांपुर्वी लॉकडाऊन शिथील केल्यानंतर काही प्रमाणात ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीत शुभविवाह संपन्न होऊ लागले. अशात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य बनले. घराबाहेर पडणार असाल तर मास्क जरूर वापरा असा जणू संदेश देण्यासाठी संदीप सांगावकर यांनी नवरा नवरीसाठी प्रतिकात्मक मास्क म्हणून खास चांदीचे मास्क तयार केले आहेत.

मास्क वापरण्याविषयी अनोखी जनजागृती

कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क वापरण्याविषयी शासन, वैद्यकीय यंत्रणेतर्फे प्रबोधन मोहिम राबविली जात आहे. रस्त्यावरून मास्क न घालता वावरल्यास त्या व्यक्तीला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी लग्नसमारंभातून चांदीचा मास्क लावून मास्क वापरण्याविषयी अनोखी जनजागृती संदीप सांगावकर या युवकाने केली आहे. लग्न म्हणजे दागिने मिरवण्याचा समारंभच. परंतू आता हे दागिने घालूनही पाहायला कोणी नाही अशी स्थिती. त्यातच कोरोनाचे सावट आणखी गडद झालेले. त्यामुळे लग्नातील क्षण अविस्मरणीय करण्यासाठी चांदीच्या मास्क नवरा नवरीला घालता येणार आहे. आणि त्या निमित्ताने दागिन्यांची हौस ही भागवता येणार आहे.

लॉकडाऊन काळातील कारिगीरी

लॉकडाऊन काळात प्रत्येकालाच सक्तीने घरी बसावे लागले. अशा वेळी अनेकांनी विविध छंद जोपासत कलात्मक वस्तू तयार केल्या. संदीप यांनीही आपल्या व्यवसायाशी संबधित व सद्यस्थितीला साजेसे मास्क तयार करण्यास सुरवात केली. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करताच त्याला प्रतिसादही चांगला मिळू लागला.


लॉकडाऊन काळात भरपूर वेळ मिळत होता. त्याचा सदुपयोग करण्यासाठी मास्क तयार करावा अशी कल्पना सुचली. 25 ग्रॅम चांदीपासून तयार केलेला मास्क किफायतशीर दरात उपलब्ध होतो.
- संदीप सांगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT