Mobile WhatsApp Matka Gambling Khanapur Police
Mobile WhatsApp Matka Gambling Khanapur Police esakal
कोल्हापूर

Khanapur : पालकांचं टेन्शन वाढलं! मुलांकडून मटका, जुगारसह अमली पदार्थांची मोबाईलवरच खरेदी

सकाळ डिजिटल टीम

तीन महिन्यांपूर्वी रामगुरवाडी क्रॉस येथून खानापूर पोलिसांनी (Khanapur Police) व्हॉटस्‌ ॲपवर ग्रुप (WhatsApp) बनवून गांजासह अन्य अमली पदार्थाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते.

खानापूर : सातत्याने मोबाईलमध्ये (Mobile) नेट सर्फिंग करणारी मुले पालकांचे टेन्शन वाढवत आहेत. घरोघरी, गल्लीबोळात विद्यालयांच्या आवारात हातात मोबाईल घेतलेले तरुण, तरुणी दिसून येतात, मटका, जुगार खेळण्यासह अमली पदार्थांची खरेदी-विक्री मोबाईलवरच केली जात असल्याने पालक त्रस्त झाले आहेत.

आभासी गेमिंग झोन वाढल्याने पारंपरिक मैदानी खेळ इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. नेट सर्फिंगमुळे अफाट माहिती मिळते, मुलांच्या ज्ञानात भर पडते. कॉम्प्युटर, इंटरनेट, त्यातील अफाट ज्ञानाचा खजिना जरी उपयुक्त असला तरी त्याचे दुष्परिणाम त्याहून अधिक आहेत.

तीन महिन्यांपूर्वी रामगुरवाडी क्रॉस येथून खानापूर पोलिसांनी (Khanapur Police) व्हॉटस्‌ ॲपवर ग्रुप (WhatsApp) बनवून गांजासह अन्य अमली पदार्थाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या फोनमधून कित्येक शाळकरी मुले यात सहभागी असल्याची महिती पुढे आली.

नेटमध्ये मुले कशी अडकतात

इंटरनेट आणि त्याद्वारे चालविले जाणारे विविध प्रवाह प्रथम मुलाच्या छंदाविषयी बोलतात मुलाच्या कौटुंबिक, शालेय जीवनातील किंवा इतर समस्यांमध्ये रुची दाखवितात, यातच तो वापरकर्ता विश्वास ठेवतोय,आपल्या प्रभावाखाली आहे. असे वाटू लागले की, संवादातील विषय बदलू लागतात. सामान्य विषय सोडून खासगी विषयांवर आणि बरेचदा अश्‍लील विषयावरही चर्चा सुरू होते. मुले नकळतच ते या जाळ्यात अडकतात.

Shrimant Patil : 'थोडक्याच मतांनी माझा पराभव झालाय, ती हार मी खिलाडी वृत्तीनं स्वीकारलीये'

कसे बाहेर पडतील

संकटांविषयी मुलांना आधीच ऑनलाईन जागरूक करा. एखादी संशयास्पद वेबसाईट किंवा तसा तपशील दिसल्यास, तो मुलांना विश्वासात घेऊन एकमताने डिलिट करा. नको असलेले मेसेज किंवा वेबसाईट टाळण्यासाठीचे एखादं सॉफ्टवेअरही मोबाईल फोनमध्ये बसवून घेता येऊ शकते. इंटरनेटवरही चांगल्या माहितीसोबतच वाईट गोष्टींचीही माहिती असतेच. मग मुले इंटरनेटचा वापर नक्की कशासाठी करताहेत? हे पालक म्हणून तापासायला हवे.

विद्यार्थी भरपूर वेळ ऑनलाईन राहू लागली, अचानक मुलांना अनोळखी व्यक्तींचे फोन येऊ लागले, कॉम्प्युटरवर अश्‍लील वेबसाईट येऊ लागल्या, मुले दैनंदिन कामातून अंग काढून घेऊ लागली की, काही तरी गडबड आहे, हे ओळखायला हवे. अशावेळेस त्रागा करून, स्वतःला, मुलांना दोष देऊन काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा शांतपणे, विचारपूर्वक मुलांशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे आहे.

-संजीव वाटूपकर, शिक्षक.

पारंपरिक मैदानी खेळ मागे पडले

मोबाईलवरील विविध गेम, त्यावर लावण्यात येणारा सट्टा, यामुळे विटी दांडू, लगोरी, पारंब्या, लपा छपी, यासारखे पारंपरिक खेळ तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलसारखे खेळ क्वचितच खेळले जातात. त्यामुळे मैदाने ओस पडली आहेत. ऑनलाईन गेमिंग सट्टामुळे अनेकजण कर्जबाजारी झल्याची उदाहरणे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

SCROLL FOR NEXT