mayor of kolhapur municipal of shiv sena said rajesh kshirsagar in press confereance kolahpur
mayor of kolhapur municipal of shiv sena said rajesh kshirsagar in press confereance kolahpur 
कोल्हापूर

'यंदाचा महापौर शिवसेनेचाच' ; आता पुर्ण तयारीनिशी मैदानात

युवराज पाटील

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद याचा निश्चितपणे वापर करू, यावेळी महापौर हा शिवसेनेचाच असेल असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ते म्हणाले, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचा अधिकार आपल्याला दिला आहे. मतदानाच्या आधीच्या दोन रात्री काही चक्रे उलटी फिरतात त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा निसटता पराभव होतो. मात्र यावेळी आम्ही सर्व तयारीनिशी मैदानात उतरणार आहोत. त्यामुळे यावेळी किमान तीस जागा निवडून आणू. महापौर हा शिवसेनेचा असेल. 

अन्य पक्षातून जे उमेदवार शिवसेनेत येऊ इच्छितात, त्यांची निभावण्याची क्षमता असेल तर त्यांनाही तिकीट दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अजित मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे पुत्र अभिजीत देवणे यांच्यासह नंदकुमार मोरे, राजू मोहिते, महेश उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर, उत्तरचे शहर प्रमुख रवींद्र यादव, वैशाली शिरसागर, सरिता मोरे आदी संभाव्य उमेदवार उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT