Mayor of Sangli Miraj and Kupwad Municipal Corporation elections sangli political marathi news 
कोल्हापूर

तयारी जय्यत: लक्ष महापौर निवडीकडे ; आघाडीचे मतदान कोल्हापुरातून तर भाजपचे सांगलीतून

सकाळ वृत्तसेवा

सांगली  : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा महापौर कोण होणार याचा फैसला होण्यासाठी काही मिनिटांचा अवधी उरला असताना उत्कंठा शिगेला पोहचली आहे. ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्‍लब हाऊसमधून मतदान करणार आहे. साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात होईल. त्यानंतर पंधरा मिनिटे अर्ज माघारीसाठी असतील. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाईन मतदान होईल. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी हे सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. गेले चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स आता काही मिनिटात संपणार आहे. सत्ताधारी भाजपमधील सात सदस्य नॉटरिचेबल, नगरसेवकांची नाराजी शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील महापौरपदाच्या उमेदवारी या साऱ्याचा घोळ आज सकाळपर्यंत कायम राहिला. धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम भाजपचे महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत. महापौरपदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा याबाबतचा सस्पेन्सही आज कायम होता. 


भाजपकडे 42 जणांचे बहुमत आहे. मात्र त्यांची जुळणी आत्तापर्यंत 36 जणांची निश्‍चित झाली आहे. 37 चा आकडाही बहुतमासाठी पुरेसा आहे. दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदुम आहेत. तर विजय घाडगे भाजपसाठी अद्यापही नॉटरिचेबल आहेत. भाजपचे नॉटरिचेबल अन्य चार सदस्य मिरजेचे असल्याची चर्चा आहे. आघाडीत महापौरपदाचा उमेदवार कोण याचा फैसला अद्याप नाही. त्याचा निर्णय नेते जयंत पाटील आणि जयश्रीताई पाटील अंतिम क्षणी घेण्याची शक्‍यता आहे. सव्वा सव्वा वर्षाचा निर्णय झाल्यास पहिल्यांदा कोण महापौर यावरही घासाघीस होऊ शकते.
 
राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले आहेत.  उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसकडून उमेश पाटील, तर राष्ट्रवादीकडून स्वाती पारधी व सविता मोहिते यांनी अर्ज दाखल केले आहेत. नॉटरिचेबल सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आमचाच महापौर होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. दुसऱ्या बाजूने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपचे नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात असून, महापालिकेत सत्तांतर होऊन आमचा महापौर, उपमहापौर होईल असा दावा केला.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT