MBBS admission Crime against two vagrants in Odisha kolhapur crime news 
कोल्हापूर

सावधान : मोबाईलवर तुम्हाला असा मेसेज येतो का ?  

युवराज पाटील

कोल्हापूर : त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला . त्या मोबाईल  क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तो एका महिलेचा होता.  तिने चर्चा केली आणि  वरिष्ठ अधिकारीशी बोला असे सांगून बॅंकेच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यांने ही भरले. अन् इथेच तो चांगला फसला. असे एक ना अनेक प्रकार आपण रोज ऐकतो, वाचत असतो तरीही त्याचे बळी ठरतो . ही हकीकत आहे एका एमबीबीएस’ पदवी मिळवू  पाहणाऱ्या युवकाची.

अन् इथेच तो फसला
 वसंत शेटे हे करवीर तालुक्‍यात राहतात. त्यांच्या मोबाईलवर २९ नोव्हेंबर २००० मध्ये एक संदेश आला. यात ‘एमबीबीएस’ पदवीसाठी ३० लाख रुपयांत प्रवेश मिळून देतो असा मजकूर होता. त्यात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तो मोबाईल क्रमांक संशयित ‘सोहाना’ नावाच्या महिलेचा होता. तिने प्रवेशाबाबत चर्चा केली. तिने वरिष्ठ अधिकारी म्हणून संशयित बिनयकुमार प्रधान याचा मोबाईल क्रमांक दिला.

शेटे यांनी त्याच्याशीही मोबाईलवर चर्चा केली. त्याने नगर, नाशिक या ठिकाणी १२ लाख रुपयांत प्रवेश मिळवून देतो असे सांगून बॅंकेच्या खात्यावर एक लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार शेटे यांनी त्याच्या खात्यावर एक लाख रुपये भरले; मात्र त्यानंतर संशयित बिनयकुमार हा अधिक रकमेची मागणी करू लागला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

‘एमबीबीएस’ पदवीसाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून ओडिशातील दोघा भामट्यांनी लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सोहाना मॅडम, बिनयकुमार प्रधान (दोघे रा. माचुर्ली, सलेपूर कटक, ओडिशा) अशी संशयितांची नावे आहेत. दोघा संशयितांनी एक लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद शेटे यांनी दिली. दोघा संशयितांच्या प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT