Meeting After Diwali On The Question Of Shops In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीतील गाळेधारकांच्या प्रश्नावर दिवाळीनंतर बैठक

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : जलशुद्वीकरण केंद्रालगत बांधलेल्या गाळ्यावरून वाद निर्माण झाल्याने सोमवारी प्रांत कार्यालयात या प्रश्‍नी बैठक आयोजित केली. मात्र बैठकीस प्रांताधिकारी आणि गाळेधारक उपस्थित नव्हते. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी दिवाळीनंतर बैठक घेऊन शहराच्या दृष्टीने योग्य तो कायदेशीर तोडगा काढण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. 

जलशुद्धीकरण केंद्रालगत कापड व्यापाऱ्यांनी गाळे उभारले आहेत. नगरपालिकेने तेथे मुव्हेबल गाळे उभारणीस परवानगीही दिली होती; मात्र मुख्य रस्त्यालगत पक्के बांधकाम होत असल्याने आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह विविध स्तरातून त्याला विरोध झाला. परिणामी नगरपालिका प्रशासनाने गाळे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले. या विरोधात गाळेधारकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला आणि आत्मदहनाचाही प्रयत्न केला.

या पार्श्‍वभूमीवर सोमवारी प्रांत कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले. मात्र बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि गाळेधारक प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. आमदार आवाडे म्हणाले, "पालिकेने मुव्हेबल गाळे उभारणीस परवानगी दिली असताना गाळ्याचे पक्के बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी गाळे उभारणीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही विरोध केला होता. मुख्य रस्त्यालगत गाळे उभारणे म्हणजे नागरिकांचे आरोग्य आणि वाहतुकीला धोकादायक असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्यासाठी दिवाळीनंतर बैठक घेण्याची मागणी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे केली.'' 
शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड, नगरसेवक सुनील पाटील, राजू बोंद्रे, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, मिळकत विभागाचे सी. डी. पवार उपस्थित होते. 

फेरीवाला समितीच अस्तित्वात नाही 
मुव्हेबल गाळेधारकांसाठी असणारी नगरपालिकेची फेरीवाला समितीच सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रालगत गाळे उभारणीसाठी कार्यरत असलेली समिती कशाच्या आधारावर काम करत आहे. चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू असल्याने नगरपालिकेने नवीन समिती नियुक्त करावी आणि कायदेशीर प्रक्रिया राबवावी, असे आमदार आवाडे यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात कंटेनरची तीन वाहनांना धडक, भोस्ते घाटातील घटना

Jinti Mahadev Temple: 'जिंतीच्या महादेव मंदिरात सापडलेल्या शिलालेखात यादवकालीन संदर्भ'; सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर उलगडले दोन लिंगांचे गूढ

Jitendra Awhad: जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची ठाण्यात पुनरावृत्ती, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Weight Loss Fruits Breakfast: वजन कमी करण्याचा विचार करताय? मग नाश्त्यात 'या' फळांचे करा सेवन

SCROLL FOR NEXT