Memorandum of Understanding between Shivaji University and Bardwan 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा बरद्वानशी सामंजस्य करार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - अवकाशविषयक तंत्रज्ञान आणि ग्लोबल सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम (जी.एन.एस.एस.) यांच्या संशोधनात आघाडीवर असलेल्या पश्‍चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. ऑनलाईन पद्धतीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. 

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ""सुरवात "जीएनएसएस' विषयक संशोधन सहकार्याने होत असली तरी केवळ तेवढ्यापुरताच हा करार मर्यादित राहू नये, तर दोन्ही विद्यापीठांतील विविध अधिविभागांनी पुढे येऊन हे शैक्षणिक, संशोधनविषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्याची अधिक उत्तम फळे मिळतील. 

बरद्वान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ए. के. पाणिग्रही म्हणाले, ""शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला हा सामंजस्य करार आनंददायी क्षण आहे. अवकाश संशोधनाच्या अनुषंगाने डाटा विश्‍लेषणात शिवाजी विद्यापीठाची कामगिरी उच्च दर्जाची आहे. या सहकार्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांचा अवकाश संशोधनातील लौकिक निश्‍चितपणे वाढीस लागेल. 

कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर बरद्वान विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. अभिजित मुझुमदार यांनी स्वाक्षरी केल्या. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. आर. के. कामत, डॉ. पी. के. चक्रवर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. के. वाय राजपुरे यांनी स्वागत केले. डॉ. राजीव व्हटकर, बरद्वान विद्यापीठाचे डॉ. अनिंद्य बोस यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT