कोल्हापूर

मिस्टर पाटील तुमचे जेवढे वय नाही... अन् एन.डीं.ची. तोफ दणाणली

मोर्चा का रोखलात, आम्ही काय तुम्हाला चोर वाटलो की दरोडेखोर ?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गांधी मैदानात त्यावेळी महायज्ञ सुरू होता. त्या विरोधात पुरोगामी कार्यकर्त्यात संतापाची भावना होती. त्यातूनच मोर्चा शिवाजी पेठेतील गांधी मैदानाच्या दिशेने निघाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, गोविंद पानसरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पापाची तिकटीजवळ मोर्चा पोलिसांनी अचानक रोखला. त्यानंतर शांत बसतील ते एन. डी. कसले. ज्या पोलिस अधिकाऱ्याने मोर्चा रोखला त्याच्यावर एन.डीं.ची. तोफ दणाणलीच, ‘मिस्टर पाटील तुमचे जेवढे आता वय आहे तेवढी माझी सार्वजनिक जीवनात गेली आहेत. मोर्चा का रोखलात, आम्ही काय तुम्हाला चोर वाटलो की दरोडेखोर, असे शब्द बाहेर पडताच संबंधित पोलिस अधिकारीही हादरला आणि मोर्चाला वाट मोकळी झाली.

एन. डीं.च्या रोखठोकपणाची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील हे एक दुर्मिळ. गांधी मैदानातील त्या यज्ञाची सुरुवातीला दाहकता जाणवली नाही. नंतर यज्ञाची श्रीमंती पाहता अनेकांचे डोळे उघडले. त्या विरोधात कोणीतरी आवाज उठविण्याची तयारी सुरू झाली. पण नेमकी भूमिका घेणार कोण? असा प्रश्‍न होता. कोल्हापुरात एखाद्या सार्वजनिक प्रश्‍नावर आंदोलन करायचे म्हंटले तर एन. डी. मंडलिक आणि पानसरे ही माणसे ठरलेली असायची. यज्ञाच्या विरोधात मोर्चा काढणे सोपी बाब नव्हती. तिघांच्या हाकेला प्रतिसाद देणारे अनेक कार्यकर्ते होते. त्यांची मोट बांधली गेली आणि अखेर मोर्चा निश्‍चित झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा गांधी मैदानाकडे कूच करू लागला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. गांधी मैदानाजवळ मोर्चा पोहचला आणि त्यातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणावर तैनात होते. नेमका पापाची तिकटीजवळ मोर्चा रोखला. अचानक घडामोड झाल्याने एन.डी.ही चांगलेच संतापले.
जे पोलिस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते त्यांना सर्वांसमोरच उद्देशून एन.डी. बोलत होते. त्यावेळी वातावरण काही काळ शांत झाले. एन.डी. यांचा आवाज खणखणीत की त्यांना माईकची गरज कधी लागली नाही. त्या अधिकाऱ्याचे वय आणि अनुभवावर बोट ठेवत ‘मिस्टर पाटील तुमचे जेवढे वय आहे तेवढी माझी हयात सार्वजनिक जीवनात गेली आहे. मोर्चा का अडविला आम्ही चोर आहोत की दरोडेखोर असे म्हणताच संबंधित अधिकारी निरूत्तर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT