Merchants will open shops today Decision of Maharashtra Chamber of Commerce covid 19 impact kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापुरात आज दुकाने उघडणार;महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यात संपूर्ण लॉकडाउनचे सूतोवाच राज्य सरकारने केले असले तरी अद्याप त्याचा अधिकृत निर्णय न झाल्याने राज्यभरात संभ्रमावस्था आहे. येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण लॉकडाउन लागण्याची शक्‍यता असल्याने तत्पूर्वी विविध पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी आज सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरू करतील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. 

राज्य सरकारचा निर्णय आज सायंकाळपर्यंत येईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे राज्यभरातील व्यापारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते; परंतु सरकारने आज कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. वर्षअखेरनंतरच्या सरकारी कामकाजाची पूर्तता, तसेच अन्य बाबींची तयारी लॉकडाउनपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील व्यापारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या मर्यादित वेळेत कोरोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचे कडकपणे पालन करून आपले व्यापार सुरू करणार असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आले आहे. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी, राज्यभरातील व्यापाऱ्यांना कोरोनासंबंधीच्या निकषांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. 

व्यापाऱ्यांना आवाहन
मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या बाबींचे कसोशीने पालन करावे. दुकानदारांनी स्वतःसह कामगारांच्या तपासण्या करून व्हॅक्‍सिनेशनही लवकरात लवकर करून घ्यावे, असेही आवाहन चेंबरतर्फे राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT