Merry Christmas will be taking care of Corona 
कोल्हापूर

कोरोनाची खबरदारी घेत होणार मेरी ख्रिसमस..! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण उद्या (शुक्रवारी) सर्वत्र साजरा होणार असून सेलिब्रेशनच्या तयारीसाठी आज दिवसभर बाजारपेठेत गर्दी राहिली. केक शॉप, मॉल्सच्या बाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्‍लॉज, केकच्या ऑर्डर देण्यासाठी लागलेल्या रांगा, सांताक्‍लॉजच्या टोप्यांचे आणि वेशभूषेचे स्टॉल असे वातावरण शहरात अनुभवायला मिळाले. दरम्यान, वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, ऑल सेंट चर्च, सेंट झेवियर्स चर्च, ब्रह्मपुरी चर्च, विक्रमनगर चर्च आदी ठिकाणी उद्या सकाळपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा नाताळच्या निमित्ताने चर्चमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. चर्चमध्ये पहिल्यांदा येणाऱ्या दोनशे व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुलांना चर्चमध्ये प्रवेश असणार नाही. व्यासपीठावर फक्त दहा गायकच उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून मिळाल्या आहेत. 
शहरातील सर्वच चर्चमध्ये नाताळनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.  नाताळाच्या उत्साहासोबत विविध सामाजिक उपक्रमही चर्चच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सकाळी सव्वाआठ ते सव्वा नऊपर्यंत इंग्रजी उपासना केली जाणार आहे, तर कळंबा जेल येथे सकाळी नऊ वाजता ख्रिस्त जन्मदिन उपासना केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी तीन ते रात्री नऊपर्यंत सुवार्ता प्रसार कार्यक्रम होईल. शहर उपासना मंदिरमध्ये सायंकाळी साडेचार ते सायंकाळी सातपर्यंत ख्रिस्त जन्मदिन उपासना कार्यक्रम होईल. 


आठवडाभर विविध कार्यक्रम 
नाताळनंतरही आठवडाभर विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांसोबत उपासना कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. 26) बाचणी, देवाळे येथे व रविवारी (ता. 27) वायल्डर मेमोरियल चर्च येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतील. सोमवारी (ता. 28) कुडित्रे व कोपार्डे, घरपण तसेच मंगळवारी (ता. 29) बालिंगा व पाडळी, खुपिरे या ठिकाणी ख्रिस्त जन्मदिन उपासना होईल. बुधवारी (ता. 30) शिरोली, लक्षतीर्थ वसाहत व शिंगणापूर येथे ख्रिस्त जन्म उपासना केली जाईल. गुरुवारी (ता. 31) रात्री दहा वाजता वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये वॉच नाईट सर्व्हिस व प्रभूभोजन होईल. शुक्रवारी (ता. 1) नववर्षातील पहिल्या दिवशी नवीन वर्ष शहर उपासनेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

Maharashtra Cold : राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT