Meter readings sent by the app to over 22,000 customers 
कोल्हापूर

22 हजारांवर ग्राहकांचे ऍपद्वारे मीटर रीडिंग 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर परिमंडलातील 22 हजार 728 वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे एप्रिलचे मीटर रीडिंग स्वत:हून पाठविले आहे. राज्यातील वीज ग्राहकांचा हा आकडा 3 लाख 63 हजार असून, पुणे परिमंडलातील सर्वाधिक 69 हजार 912, तर कल्याण परिमंडलातील 58 हजार 210 वीज ग्राहकांचा त्यात समावेश आहे. 

महावितरणने 23 मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. संचारबंदीत मीटर रीडिंग उपलब्ध होणे शक्‍य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीज बिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व "महावितरण' मोबाईल ऍपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. रीडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला वीज ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 

मीटर रीडिंग पाठविलेल्या वीज ग्राहकांची संख्या अशी : पुणे परिमंडल - 69912, कल्याण- 58210, भांडूप- 37543, नागपूर- 27720, नाशिक- 25831, , बारामती- 20941, जळगाव- 17664, औरंगाबाद- 16374, अकोला- 13767, अमरावती- 13540, चंद्रपूर- 8824, कोकण- 8542, नांदेड- 7348, गोंदिया- 7268, लातूर परिमंडल - 6963. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Flag: प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रध्वजाची सन्मानपूर्वक विल्हेवाट कशी लावावी? वाचा कायदा काय सांगतो

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

Horoscope : 26 जानेवारीनंतर धनयोग सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक येतील पैसे अन् प्रेमात यश, ऐकायला मिळेल मोठी खुशखबर

India EU FTA : खुशखबर ! कार्सच्या किमती आणखी कमी होणार; भारताच्या 'या' डील नंतर कार खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी

SCROLL FOR NEXT