migration of birds from another country in rankala lake kolhapur to late for this year 
कोल्हापूर

यंदा कळंबा, रंकाळ्यावर परदेशी पाहुणे येणार थोडे उशिराच ; का ते वाचा ?

मोहन मेस्त्री

फुलेवाडी (कोल्हापूर) : सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिना आला की कळंबा तलावावर उगवत्या सूर्यकिरणांबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट वाढू लागतो. कोवळ्या उन्हात शिकार करणारा किंगफिशर, मावळतीच्या सूर्यकिरणांबरोबर परतणारे स्थानिक, देशी-विदेशी पक्ष्यांचे थवे असे वैविध्यपूर्ण पक्षीवैभव कळंबा तलाव आणि परिसरात दिसू लागते. पण गेली दोन वर्षे पावसाळा ऋतुच लांबत गेल्याने हा नजाराही उशिरा दिसत आहे. 

सध्या तलावावर टिटव्यांची संख्या मात्र अधिक दिसत असून यामुळे कळंबा आणि रंकाळा तलावावरील हे पक्षीवैभव यंदाही उशिरा पहावयास मिळणार आहे. काही पाणकावळे, टिटवी आणि बोटावर मोजता येणारे स्पॉट बिल डक वगळता कळंबा तलावावर पाणपक्षी फारसे दिसून येत नाहीत. शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक कळंबा तलाव परिसरातील जैवविविधतेमुळे दरवर्षी असंख्य परदेशी व परप्रांतीय पक्ष्यांचे आगमन होत असते.  

गेल्या काही वर्षांपासून तलावाच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या नागरिकरणामुळे निर्माण होणाऱ्या आवाजांमुळे येथील पक्ष्यांच्या अधिवासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे परदेशी पाहुणे पक्षांच्या संख्येत घट होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मार्श हॅरिअर (दलदल ससाणा), स्पॉट बिल्ड डक. कॉमन किंगफिशर (खंड्या), व्हाइड थ्रोटेड किंगफिशर,  ग्रीन बी-इटर (वेडा राघू), भारद्वाज, जांभळी कोंबडी (परपल हेन), कूट (नाम्या), ब्लॅक विंग स्टिल्ट (शेकाट्या), रिव्हर्टन, लिटल इग्रेट (पाणबगळा), चिखल्या असे पक्षी दिसून येत असतात. पण गेल्या दोन वर्षापासून पावूस लांबत आहे. त्यामुळे ऋतुचक्रही पुढे गेले आहे. 

तसेच कळंबा  तलावाचा गाळ काढल्याचाही या जैवसमृध्दीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पक्षांच्या संख्येवरही मर्यादा येत आहे. रंकाळा आणि कळंबा तलावावर पक्षी दिसू लागतात.  बॅंक फिडर, (काठावर चरणारे) मिडल फिडर आणि सेंट्रल फिडर असे पक्षी असतात. पण यंदा कळंबा तलावाचे पाणी आजही सांडव्यावरुन वाहत आहे. 

तलावाचे पाणी काही प्रमाणात आटून आत गेले तर काठावर तयार होणारी दलदल  गाळ पाणपक्षांसाठी घर आणि अन्नांची सोय असते. या दलदलीतले जीव या पक्षांचे खाद्य असते. पण तलावाभोवती यंदा चिखल दलदल निर्माणेच झालेली नसल्याने पक्षांना खाद्याची वाणवा भासत आहे.  या ठिकाणी असणारे किटक या पक्षांना तेथील परिस्थितीचे आकलन करुन देत असतात. तसेच त्यामुळे पक्ष्यांचे आगमन ही लांबले आहे  यंदा वाढलेल्या पावसाने विश्रांती घेतली तर ऑक्‍टोंबर नोव्हेंबर अखेरपर्यंत पक्ष्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्‍यता आहे.  


टिटवी संख्या वाढली

शहराच्या आसपासच्या रिकाम्या जागांवर माळरानांवर सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे रहात असल्याने टिटव्यांनी आपला मोर्चा आता कळंबा तलावाच्या भोवती वळवला आहे. तलावाभोवतीच्या रिकाम्या जागांवर टिटव्या अगदी कळपाने दिसत आहेत.

"कळंबा तलाव सौदर्यीकरणाच्या नावाखाली चाललेल्या कामाने जैवसाखळी तुटत आहे. त्यात पावसाळाही लांबत आहे. याचा परिणाम परदेशी पक्ष्यांच्या आगमन आणि अधिवासावर होत आहे. पक्ष्यांच्या संख्येवरही मर्यादा येत आहे. रंकाळ्याचीही शांतता भंग पावली आहे."

- सुहास वायंगणकर, पर्यावरण तज्ज्ञ, पक्षी अभ्यासक

संपादन - स्नेहल कदम  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT