milk agitation by Swabhimani Shetkari Sanghatana took a violent turn on the border of Sangli district of Kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवरती दूध आंदोलनाला हिंसक वळण : स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडला दुधाचा टँकर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवरती हिंसक वळण लागले.

 स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातून मुंबईला दूध घेऊन जाणारा टँकर अडवून फोडला या टँकरमधील हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले त्यानंतर कार्यकर्ते काय झाले या घटनेनंतर गोकुळ मधील वीस टॅंकर पोलीस बंदोबस्तात मुंबईला पाठवण्यात आले.


स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बिद्री येथील गोकुळच्या चीलिंग सेंटर भरती दुधाचे कॅन घेऊन निघालेला टेम्पो अडवून त्यातील दूध रस्त्यावरून ओतून दिले या घटना वगळता जिल्ह्यात गोकुळचे 80 ते 85 टक्के संकलन सुरळीत झाले आहे.


स्वाभिमानीच्या या आंदोलनाला सुरुवातीला गोकुळने ही पाठिंबा दिला होता पण संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने गोकुळ नोटीस बजावून दूध संकरण बंद ठेवता येणार नाही अन्यथा सहकार कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर गोकुळ ने या आंदोलनातून माघार घेतली.

दूध  फ्लॅशबॅक आंदोलन

* शिरोळ तालुक्यातील नांदनी याठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथला अभिषेक घालून दूध आंदोलनाला सुरुवात.


 * कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिद्री, टिटवे परिसरात गोकुळ दूध संघाकडे घेऊन जाणार्‍या गाड्या आडवून गाड्यांमधील दूध ओतून दिले


*स्वाभिमानी शेतकरी संघटना भोगावती बिद्री परिसरात आक्रमक झाल्याचे चित्र 


*ग्रामीण भागातून कोल्हापुर मधल्या गोकुळ शिरगाव येथील दूध संघाकडे जाणारे दूध रोखले

 
*शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून गेले

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयटी इंजिनिअरला १४ कोटींना लुबाडणाऱ्या भोंदूबाबासह तिघांना अटक, दोघे फरार; मोठे अपडेट समोर

MS Dhoni : धोनी आयपीएलचा पुढचा हंगामही खेळणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं...

Winter Saree Style: थंडीला टाटा बाय-बाय! ऑफिससाठी साडीत स्टाइलिश राहण्यासाठी 'या' 5 खास टिप्स

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Laxman Hake : हा थिल्लरपणा... जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT