Maratha Reservation Hasan Mushrif  esakal
कोल्हापूर

'मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू, मनोज जरांगेंनी मुंबईत येऊन उपोषण करू नये'; असं का म्हणाले मुश्रीफ?

ओबीसी आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

आरक्षणयोध्दा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी मुंबईत येऊन उपोषण करू नये.

कोल्हापूर : येत्या आठवड्याभरात मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर समाजाला विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली.

दरम्यान, आरक्षणयोध्दा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी मुंबईत येऊन उपोषण करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, ‘‘जरांगे-पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करू नये, यासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार बच्चू कडू यांनी प्रयत्न केले. राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना ओबीसी दाखले दिले जात आहेत.

ओबीसी आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. त्यामुळेच मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जरांगे यांची मागील उपोषणामुळे प्रकृती ठीक नाही, त्यामुळे त्यांनी मुंबईत उपोषण करू नये.’’

जरांगे यांनी सरकारवर विश्वास ठेवावा!

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे सांगितले की, राज्य सरकार फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा कायदा करणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर विश्‍वास ठेवावा. आरक्षणासाठी सर्व्हे करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT