minister hasan mushrif demand to doctor opd  
कोल्हापूर

डॉक्‍टरांनो, हात जोडतो! 'या' मंत्र्याचे भावनिक आवाहन 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर- ‘‘शहरासह जिल्ह्यातील सर्वच खासगी डॉक्‍टरांनो, तुम्हाला हात जोडतो. ओपीडी आणि इतर सेवा सुरू ठेवा! ’’ असे भावनिक आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले. कोरोना सोडून इतर आजार आणि व्याधींच्या रुग्णांची फरफट होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

‘जिल्ह्यातील अनेक खासगी दवाखाने, मल्टिस्पेशालिटी दवाखान्यांनी कोरोनाच्या भीतीपोटी ओपीडी व इतर सेवा बंद केल्या आहेत. अथवा पॅरामेडिकल कर्मचारी येत नाहीत, अशी सबब सांगितली जाते. हे बरोबर नसून कोरोना सोडून अनेक आजार, व्याधी आहेत. त्यासाठी कोठे जायचे? खोकला, सर्दी, पडसे किंवा कोरोना लक्षणे असलेले रुग्ण ही सरकारी रुग्णालयात पाठवावे, अशी सूचना शासकीय पातळीवर केली आहे. पण, कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड, मधुमेह, पित्ताशय, हर्निया, दात, हाड व नेत्रविकार असे अनेक आजार, व्याधी आहेत की यासाठी लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात जायचे कोठे? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून धर्मादाय दवाखान्यामधून दर आठवड्याला रुग्ण नित्यनियमाने मुंबईला जाऊन उपचार व शस्त्रक्रिया करून आणत होतो. मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेकांना मदत करीत होतो. कोरोनामुळे लॉकडाउनपासून वाहतूक बंद झाली. रुग्ग्णालयांनी ज्यांना तारखा दिल्या, ते रुग्ण माइयाकडे येतात, त्यांच्या व्यथा, त्यांचे होणारे हाल पाहिल्यावर मी निःशब्द होतो. मुंबईतील अनेक रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांत कोरोनाचा फैलाव झाल्याने शासनाने रुग्णालये ‘सील’ केली आहेत.  कोल्हापूरमधील मोठ्या खासगी रुग्णालयांतून उपचार करून घेणे एवढाच मार्ग आहे. तेवढी सेवा आपण करावी, अशी विनंती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आजचा भारत दहशतवाद सहन करत नाही’; ‘मन की बात’मधून PM मोदींचा थेट संदेश, नेमकं काय म्हणाले?

Bandhavgarh Elephant Festival: बांधवगड हत्ती महोत्सवात चिमुकल्या ‘कृष्णा’ची हवा; खोडकर खेळांनी जिंकली पर्यटकांची मने! काय आहे मुख्यमंत्र्यांशी कनेक्शन ?

Thane News: ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला, सिमेंटच्या विटेने डोक्यावर प्रहार; उपचारापूर्वीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रेचा कार्यक्रम जाहीर; २९ ऑक्टोबरला मुख्य भाकणूक

Virat Kohli स्वत:ला सर्वोत्तम क्रिकेटर समजतो का? रोहित-धोनीशी काय व्हायच्या चर्चा? किंग कोहलीने दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT