Minister Mushrif Said, The Idea Of ​Giving Mobiles To Needy Students Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा विचार : मंत्री मुश्रीफ

अशोक तोरस्कर

उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्‍यात आला नाहीतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा शासन विचार करीत असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगिलले उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते. 

अध्यक्ष धनाजी रावण यांनी स्वागत केले. मुश्रीफ म्हणाले, ""कोरोनामुळे शाळा बंद आहेत; मात्र शिक्षण चालू आहे. प्राथमिक शाळेतील मुले ही कोरोनामुळे शाळेत जाऊ शकले नाहीत. कोरोना संसर्ग वाढला तर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे नियोजन आहे. शिक्षकांनी प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न करावेत.'' 

मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी सभापती वसंतराव धुरे, माजी जि. प. सदस्य काशिनाथ तेली, सभापती पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास महादेव पाटील, रावसाहेब देसाई, रवींद्र पाटील, शिरीष देसाई, संतोंष गुरव यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात 'हे' भत्ते होणार रद्द, पेन्शन होईल दुप्पट? सरकारची नवी घोषणा कोणती?

Sindhudurg News: अतिवृष्टीमुळे झाडी आणि खोदकामाने ‘मालवण–तारकर्ली’ रस्ता बनला धोकादायक; ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप!

Elephant Assault: ‘ओंकार’ हत्तीवर झालेल्या मारहाणीने संतापाचा ज्वालामुखी; ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींची दोषींवर तातडीने कारवाईची मागणी!

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

SCROLL FOR NEXT