Minister Mushrif Said, Vendors And Every Trader Should Get Antigen Tested Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

विक्रेते आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी अँटीजेन टेस्ट करून घ्यावी, "या' मंत्र्यांनी केले आवाहन..

अजित माद्याळे

गडहिंग्लज : सध्या कोरोना विस्फोटच्या टप्प्यावर आहे. लोकांना मास्कचा वापर सक्तीने करण्यासाठी भाग पाडावे. अँटीजेन टेस्टची सुविधा मागतील त्या सर्व खासगी दवाखान्यांसह धर्मादाय रूग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली जात आहे. गर्दीची ठिकाणे असलेल्या सर्व प्रकारचे विक्रेते आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनीही आपली अँटीजेन टेस्ट करून घ्यावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. दरम्यान, आता महात्मा फुले योजनेत गडहिंग्लजमधील आणखीन आठ दवाखाने अंतभूर्त होणार असून त्यामुळे इतर आजाराच्या रूग्णांवर उपचार होण्यास मदत होईल. 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. त्यानंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मुश्रीफ म्हणाले, ""लस उपलब्ध होईपर्यंत कोरोनाशी संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. स्क्रिनींग मोहिम राबवावी लागणार आहे. परंतु, त्यासाठी आवश्‍यक किट आणि लॅब टेक्‍नीशियन वाढवायला हवेत.

आऊटसोर्सिंगने या जागा भराव्यात अशी सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोविड सेंटरला एमबीबीएस, एमडी फिजीशियन ही पदे रिक्तच आहेत. चांगला पगार असूनही कोणी पुढे येईनात. फिजीशियन आल्यानंतर मृत्यू दर कमी होणार आहे. जे कोणी पुढे येणार नाहीत, अशांसाठी मेस्मा लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.'' या वेळी शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

'उपजिल्हा'समोर मदतकक्ष 
उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी राखीव ठेवल्याचे ग्रामीण भागातील अनेकांना माहित नाही. परिणामी इतर आजाराचे सामान्य रूग्ण अजूनही उपजिल्हाकडेच उपचारासाठी जात आहेत. परंतु, तेथे उपचार होत नसल्याचे कळताच इकडे-तिकडे उपचारासाठी फिरत आहेत. यात वेळ जात आहे. यामुळे उपजिल्हा रूग्णालयासमोर आता मदतकक्ष स्थापून येणाऱ्या रूग्णांना इतर हॉस्पीटलची माहिती देण्यासह त्याठिकाणी संबंधित रूग्ण जावून उपचार घेवून घरी जाईपर्यंतचा फॉलोप घेण्याच्या सूचना यावेळी मुश्रीफ यांनी दिल्या. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT