Minor rides in Kolhapur became less 
कोल्हापूर

कोल्हापूरात अल्पवयीन रायडस झाले कमी

राजेश मोरे

कोल्हापूर ः लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण कमी झाले. तरीही वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच आहे. जर मुलावर कारवाई झाली तर त्याचा फटका पालकांना बसत असल्याने तेही आता चांगलेच जागरुक झाले आहेत. 
नववी, दहावीच्या इयत्तेत मुले गेली की त्यांचा गाडीसाठी हट्ट सुरू होतो. त्या हट्टाला अनेक पालक बळी पडतात. काही पालक आपली हौस पूर्ण झाली नाही. मुलांबाबतीत ते घडू द्यायचे नाही. म्हणून मुलांच्या मागणीला महत्त्व देतात. येथून गेल्या काही वर्षांपासून नववी, दहावीतील मुलांच्याही हाती वाहने दिसू लागली. शाळा, खासगी शिकवणीच्या निमित्ताने ही मुले मोपेड, मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडायची. तेथून शहर परिसरातून फटका मारायची. वाहतूक नियमांचे ज्ञान नसलेल्या अशा मुलांकडून अपघाताचे धोके अधिक असतात. अशा अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई आधी वाहतूक पोलिसांकडून प्रबोधनाची मोहीम हाती घेतली होती. वाहतूक पोलिस शाळा महाविद्यालयात जाऊन वाहतूक नियमांची माहिती विद्यार्थ्यांना देत होते. अल्पवयीन असताना वाहन चालविण्याचे काय धोके असतात हे पटवून दिले, तरीही अल्पवयीन वाहनचालकांचे प्रमाण कमी होत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून वाहतूक पोलिसांनी संबंधितावर कारवाईची प्रक्रिया तीव्र केली. 
कारवाईच्या सुरवातीला वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना नियंत्रण शाखेत आणले जात होते. येथे त्यांच्या पालकांना बोलवून घेऊन मुलाने नेमकी काय चूक केली आहे. त्याचा काय धोके आहेत, याची जाणीव करून दिली जात होती. यातूनही अल्पवयीन वाहनचालकांचे प्रमाण कमी होत नसल्याने संबंधित मुलांच्या पालकांवरच थेट खटले दाखल केले जाऊ लागले. लॉकडाउनमुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुलांना पालकांना कोणतेही कारण देता येत नाही. परिणामी शहर परिसरासह जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे, तरीही वाहतूक पोलिसांकडून यासंबंधीची कारवाई अखंडित सुरूच आहे. 


अल्पवयीन वाहनचालकांवर केलेली कारवाई 
सन कारवाई संख्या 
2018 257 
2019 70 
-------------------------- 
2020 संख्या दंडवसूल 
ऑगस्टअखेर 8 4000 

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : तत्कालीन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा सुद्धा दुबार मतदान यादीत नाव

SCROLL FOR NEXT