MLA Abitkar Said, Let's Try To Find Concrete Solutions For Wild Elephants Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जंगली हत्तींच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करू, "या' आमदारांनी दिले आजरावासियांना आश्‍वासन

रणजित कालेकर

आजरा : परिसरात दोन टस्करांनी धुमाकूळ घातला. शेतीचे मोठे नुकसान सुरू आहे. त्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. 
हाळोली (ता. आजरा) येथील हत्तीकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, शासनाने जमीन ताब्यात घेऊन आम्हाला आकाराप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

आमदार आबिटकर म्हणाले, ""नुकसानीचे पंचनामे वन विभाग करतो, भरपाई मिळते, हे रोजचे चित्र आहे. पण, याबाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याबाबत हा प्रश्‍न पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे.'' या वेळी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले संभाजी मांगले, संभाजी कुंभार (रा. वेळवट्टी), निवृत्ती सुतार (रा. साळगाव) यांना प्रत्येकी सव्वा लाख असा तीन लाख 75 हजारांचा धनादेश तसेच येथील 20 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा एक लाख 28 हजारांच्या धनादेशाचे वाटप आमदार आबिटकर यांच्या हस्ते झाले.

आजऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. एस. के. लाड, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, नगरसेवक संभाजी पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, इंद्रजित देसाई, वनपाल सुरेश गुरव, वनरक्षक कृष्णा डेळेकर, तानाजी कवळीकट्टी, दशरथ अमृते, सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच गोविंद केरकर उपस्थित होते. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT