A mob ban order is in force in the kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापुरकर... जर बाहेर फिरताना आढळात तर तुमच्यावर होणार 'ही' कारवाई....                

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहे. जमाव बंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. 

काल रविवारी जनता कर्फ्यूत योगदान दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आज दुचाकी तसेच चारचाकी मधून काही नागरिक शहरातून अनावश्य फिरत आहेत. त्याच बरोबर गल्ल्या, उद्याने याठिकाणी गटा-गटाने विनाकारण बसून चर्चा करत आहेत. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून अद्यापही इतर दुकाने काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आजूनही बंद केली नाहीत. सर्व कोल्हापूरकरांनी अनावश्यक रस्त्यावर फिरु, नये गटा-गटाने चर्चा करत बसू नये, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने त्वरित बंद करावीत अन्यथा सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहेत. 

अनावश्यकरित्या वाहन चालवत असेल तर अशांवर उद्यापासून बंदी घालण्याचा विचार प्रशासन करीत आहे. याची दखल नगरिकांनी घ्यावी. ग्रामीण भागात परदेश प्रवास करुन तसेच पुणे, मुंबई येथून आलेली आहेत, अशा व्यक्तींनी घरामध्येच स्वत:चे अलगीकरण करावे. अशा व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 14 दिवस ठेवले जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले...

1. कोरोना प्रतिबंधासाठी गावपातळीवर यंत्रणा राबविणार.
‌2 .सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार
3. गावातील व्यक्तीला बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरुन गावात कोणाला प्रवेश द्यायचा याचे अधिकार सरंपचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तरीय समितीला देण्यात येणार.
4. पुणे, मुंबई आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. या व्यक्ती खरोखर घरीच राहतात की, बाहेर फिरतात का, फिरत असतील तर त्यांना अटकाव करणे याचे नियंत्रण तसेच या सर्वांचे अधिकार या ग्रामस्तरीय समितीला देण्यात येणार.
5. गाव हे एक घटक धरुन आपल्या गावातील सर्व नियोजन करायचे आहे. या नियोजनात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवायच्या आहे. धान्य, खाद्य पदार्थ, भाजीपाला, दूध, वैद्यकीय सुविधा, टेलीफोन, इंटरनेट आदी सुविधा सुरु राहतील.
6. ज्या कारखान्याच्या ठिकाणी ऊसतोड सुरु आहे, तो कारखाना तात्काळ बंद करता येणार नाही. अशा कारखान्याच्या मर्यादित ती सुरु राहील. त्या शिवाय इतर सर्व खासगी, शासकीय, व्यापारी आणि औद्योगिक आस्थापना बंद ठेवाव्या लागतील.
7. जमाव बंदीमध्ये पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जाणार नाहीत अथवा येणार नाहीत. बाहेरुन कोणतीही वाहन जिल्ह्यात येणार नाही अथवा बाहेर जाणार नाही, हे 31 मार्चपर्यंत नियंत्रित राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT