month and half ago, Bappa came to the stall 
कोल्हापूर

दीड महिना आधीच, बाप्पांचे स्टॉलवर आगमन

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी महापूराचा धोका निर्माण होऊन गणेश मुर्तीला झळ बसू नये, यासाठी यावर्षी उत्सवाच्या दीड महिन्याअगोदरच मूर्ती विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. यंदा गणेशोत्सव 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तत्पुर्वी आकर्षक अशा मुर्ती भागाभागात स्टॉलवर नजरेस पडू लागल्या आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना घरगुती पूजेच्या मुर्ती बनविण्यासाठी प्राथमिक काम करावे लागते ते तीन महिन्यांच्या काळात पूर्ण झाले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापराला सुरवातीला बंदी होती, नंतर केंद्र सरकारने ही बंदी उठवली. त्यामुळे प्लास्टरपासून एका दिवसाला दहा ते पंधरा मूर्ती सध्या तयार होतात. शाडूची मूर्तीसाठी मात्र दिवसाला एकच तयार होते. 

लॉकडाउनच्या काळात सर्वच उद्योग व्यवसाय बंद होते. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. शाहूपूरी कुंभार गल्ली आठवडाभर पाण्यात होती. बापट कॅम्प येथे गणेश मुर्तीचे मोठ्या प्रमाणावर काम चालते. या परिसराला महापूराची झळ बसली. 2005 च्या महापुरापेक्षा पाण्याची पातळी अधिक असणार नाही, असा अंदाज बांधला गेला. प्रत्यक्षात गेल्या वर्षी पाण्याची पातळी वाढत गेली आणि ऐनवेळी मूर्ती स्थलांतरित करण्याची वेळ आली. मोठ्या कष्टातून साकारलेल्या मूर्ती एका रात्री अन्यत्र नेण्याची वेळ आली. दरवर्षी सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असतो. यंदा ऑगस्टमध्ये आला आहे. पंधरा जुलैपासून पावसाला सुरवात झाली तर मूर्ती सुकविणे, रंगकाम या कामाला उशीर लागेल. पाण्याची पातळी केव्हा वाढेल याचा नेम नसल्याने किमान घरगुती पूजेच्या मूर्ती तरी तयार करून ठेऊ या उद्देशाने मार्च ते मे अखेर मूर्तीचे प्राथमिक काम पूर्ण झाले. गेल्या महिन्यापासून रंगकाम तसेच अन्य काम पूर्ण झाल्याने मूर्ती विक्रीसाठी बाजारात येऊ लागल्या आहेत. 

कोरोनाच्या संकटकाळात गणेश उत्सवातही काळजी घ्यावी लागणार आहे. कोल्हापुरात सर्वाधिक गर्दी उत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात होते. घरगुती गणेश मूर्ती तसेच सार्वजनिक मूर्तींच्या आगमनावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात. यंदा घरगुती पूजेच्या मूर्ती आणतानाही गर्दी कमी करावी लागणार आहे. पुर्वी कुटुंबातील सर्वच सदस्य मूर्ती आणण्यासाठी जात होते. यावर्षी अशी स्थिती असणार नाही. पूर्वी घरगुती पूजेच्या मूर्तीत नावीन्य असायचे. मूर्तीच्या आगाऊ नोंदणीसाठी गर्दी व्हायची. यावर्षी पावसाला अचानक सुरवात होऊन त्याचा परिणाम मुर्ती बनविण्याच्या कामावर होऊ नये यासाठी कुंभार बांधवांनी खबरदारी घेतली आहे. 

गेल्या वर्षाच्या महापूराचा अनुभव पाठिशी असल्याने लॉकडाऊनच्या काळात घरगुती पूजेच्या मूर्तीचे काम सुरू झाले. यावर्षी जुलैमध्ये पाऊस वाढून ऐनवेळी धावपळ व्हायला नको यासाठी मूर्ती लवकर तयार झाल्या आहेत. पंधरा जुलैनंतर जोरदार पावसाला सुरवात होईल असा अंदाज असल्याने मूर्ती तयार करण्याचे काम लवकर पूर्ण केले जात आहे. 
- उदय कुंभार, मूर्तीकार 

दृष्टिक्षेप 
- यंदा गणेशोत्सव 22 ऑगस्टपासून सुरू होणार 
- महापुराचा धोका होऊ नये, यासाठी आधीच मुर्ती तयार 
- दिवसभरात प्लास्टरच्या 10-15 मुर्ती, तर शाडूची एकच मुर्ती तयार 
- गेल्या महिन्यापासून रंगकाम पूर्ण, मुर्ती तयार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mali Violence: मालीमध्ये अल-कायदा आणि आयसिसचा दहशतवाद! ५ भारतीयांचे अपहरण अन्...; नेमकं काय घडलं?

'या' दिवशी बोहोल्यावर चढणार सुरज चव्हाण; कुठे आहे लग्न? उरलेत काहीच दिवस; समोर आली अपडेट

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

Metro Station: बांधकाम झाल्यावर कळलं; मेट्रो स्टेनशनची उंची कमी! मग 'असं' केलं जुगाड

Latest Marathi News Live Update : सांगलीमध्ये तब्बल एक महिन्यानंतर बेदाणे सौद्यांना सुरुवात

SCROLL FOR NEXT