more than 50 corona patient found and 70 patient covid 19 fight 
कोल्हापूर

कोल्हापूरात 50 नविन कोरोना बाधित तर 70 जणांनी केली कोरोनावर मात

शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी रात्री बारापासून या क्षणापर्यंत 50 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. तर जवळपास 70 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी कोरोनाबाधित मोठ्या संख्येने सापडले आहेत. त्यांची संख्या जवळपास दोन हजारांपर्यंत होती त्यांना आज रूग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 674 इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या 16 हजार 494 इतकी झाली आहे. मध्यरात्रीपासून दुपारी 1 वाजे पर्यंत 8 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 792 इतकी झाली आहे. 


जिल्ह्यातील कोरोना बाधितांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यात कोल्हापूर शहरात सर्वाधिक रूग्ण आहेत. शहरातील रूग्णांची संख्या गेल्या तीन दिवसात साडे सहाशेवर गेली आहे. या सर्वांना शहरातील सहा कोवीड सेंटरवर दाखल केले आहे तर ज्या व्यक्ती गंभीर आहेत त्यांना सीपीआर रूग्णालयात दाखल केले आहे. जिल्ह्यातील 14 शासकीय रूग्णालयात सकाळ पासून जवळपास 400 वर व्यक्तींचे नवीन स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. येत्या दोन दिवसात त्यांचे अहवाल मिळणार आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढते की काय अशी शंकाही व्यक्त होत आहे. 

गेल्या दोन दिवसात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले अशात शासकीय रूग्णालयात खाटांचा प्रश्‍न आहे. यातही सौम्य लक्षणे असलेल्यांना कोवीड सेंटर मध्ये उपचार होत आहे मात्र ज्यांची प्रकृती अधिक गंभीर आहे तर तसेच ज्यांना व्हेंन्टीलेटरची आवश्‍यकता आहे. अशातील अनेकांना मात्र व्हेन्टीलेटरची सोय मिळत नाही. शासनाने खाटांची माहिती फोनवर देण्याची सुविधा सुरू केली आहे. मात्र बहुतेक वेळा एखाद्या खासगी रूग्णालयात संपर्क साधण्यास सांगण्यात येते. मात्र तिथेही खाट उपलब्ध होतात असे नाही किंवा झाल्या तरी बिल परवडणारे नसल्याने सर्वसामान्यांना रूग्णांना ससेहोलपट सोसावी लागत आहे.  

  संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Latest Marathi News Live Update : कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

निवडणूकांच्या रणधुमाळीत राजकारणावर आधारित ‘आणीबाणी’ आता ओटीटीवर प्रदर्शित; कुठे पाहाल?

Winter Family Vacation Guide: हिवाळ्यात मुलांसोबत ट्रिप प्लॅन करताय? मग आधी 'या' टिप्स नक्की वाचा; एंजॉयमेंट होईल डबल

SCROLL FOR NEXT