कोल्हापूर

शाब्बास करवीरकन्या! एव्हरेस्टला गवसणी घालणारी कस्तुरी पहिली रणरागिणी

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : चक्रीवादळामुळे (due to cyclone) निर्माण झालेल्या असंख्य आव्हानांवर मात करून वीस वर्षीय करवीरकन्या कस्तुरी सावेकरने अगदी कमी वयात खऱ्या अर्थाने एव्हरेस्टची (mount everest) लढाई जिंकली आहे. प्रचंड वारे, हिमवर्षाव आणि एकूणच प्रतिकुल हवामानामुळे कॅम्प चारवरून तिला खाली परतावे लागले. मात्र, इतक्या उंचीपर्यंत एव्हरेस्टला गवसनी घालणारी ती कोल्हापूरची (from kolhapur) पहिली रणरागिणी ठरली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, कस्तुरी सुखरूप असून येत्या पंधरा दिवसात तिचे कोल्हापुरात आगमन होईल. यावेळी तिचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कस्तुरीच्या निमित्ताने आता कोल्हापुरात मिशन एव्हरेस्ट ही मोहिम व्यापक केली जाणार असून पदभ्रंमती, गिर्यारोहनातील नव्या पिढीला तिच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्याचा निर्णयही यावेळी झाला. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके, कस्तुरीचे वडिल व करवीर हायकर्सचे दीपक सावेकर, आई मंजू सावेकर, अरविंद कुलकर्णी, प्रशिक्षक आनंदा डाकरे, उदय निचिते, विजय मोरे, विना मालदीकर, दिनकर कांबळे, विश्वनाथ भोसले, पंडितराव पोवार, दीपक आंबर्डेकर अरविंद कुलकर्णी आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेली दोन वर्षे कस्तुरीने कष्ट घेतले. पण, तत्पूर्वी अनेक वर्षे पदभ्रंमती आणि गिर्यारोहनाच्या माध्यमातून तिची तयारी सुरू होती. गेल्या वर्षी कोरानामुळे तिची एव्हरेस्ट मोहिम थांबली. यंदाही अनेक अडचणींवर मात करत चौदा मार्चला ती एव्हरेस्टला रवाना झाली. नियोजित मोहिमेनुसार २६ मेला तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला असता. पण, तत्पूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे एव्हरेस्टवर प्रचंड वारे आणि हिमवर्षावाला प्रारंभ झाला.

सुरक्षितेतसाठी म्हणून कस्तुरीसह तिच्या टीमला कॅम्प चारवरून तीनवर व पुन्हा कॅम्प दोनवर खाली यावे लागले. मात्र, येथेही अनेक आव्हाने झेलत पुढील चढाईसाठी ही मंडळी धीटाने सामना करत होती. एकूणच सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थानिक शेर्पा, गिर्यारोहक एजन्सीज आणि सर्वच घटकांनी अखेर कस्तुरीसह टीमला बेसकॅम्पला येण्याच्या सूचना केल्या आणि त्यानुसार ती खाली परतली असली तरी केवळ निसर्गाच्या रौद्र रूपामुळे तिला माघारी परतावे लागले आहे. येत्या काही वर्षात ती येथील नव्या पिढीसह नक्कीच तिचे स्वप्न पूर्ण करेल, अशी आशाही पत्रकार परिषदेत व्यक्त झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT