Mountain trekking Permission by Collector Daulat Desai kolhapur 
कोल्हापूर

दुर्ग-डोंगर भटकंतीस जिल्ह्यात ‘ग्रीन सिग्नल’ पण असे आहेत नियम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आरोग्याच्या नियमांचे पालन करून मर्यादित स्वरूपात जिल्ह्यांतर्गत दुर्ग-डोंगर भटकंतीस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिली. त्याबाबतचे पत्र कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट माउंटेनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांना मिळाले आहे. भटकंतीस परवानगी मिळालेला कोल्हापूर जिल्हा राज्यातील पहिला असल्याचे सांगण्यात आले. मार्चमध्ये लॉकडाउन झाले. परिणामी, दुर्गवेड्यांच्या भटकंतीला ‘ब्रेक’ लागला. डॉ. अडके यांनी भटकंतीस परवानी मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले होते. 


नियम असे :

 भटकंतीच्या एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत.

प्रत्येक सदस्याचे थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक आहे. 
- जादा संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करून वेळेत फरक ठेवावा. 
- प्रत्येकाने तीनपदरी मास्क, साधा कापडी किंवा रूमाल नाक व तोंड झाकून वापरणे आवश्‍यक आहे. 
- आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शारीरिक अंतर राखण्याबाबत काटेकोरपणे दक्षता घ्यावी. 
- दहा वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींना सहभाग देऊ नये. 
- ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना सहभागी करू नये. 
- स्थानिकांच्या घरात जेवण, मुक्काम करू नये. सदस्यांनी इतरही एकत्रित मुक्काम करू नये. 
- एकमेकांच्या वस्तू (मोबाईल, कॅमेरा) हाताळू नयेत. 
- नियमांचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदींप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. 

गडकोट भटकंती तरुण पिढीला घडविणारा नैसर्गिक उपाय आहे. त्यासाठी परवानगी मिळाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होईल. मात्र, प्रत्येकाने नियमांच्या पालनात कोणतीही कसूर करू नये. 
- डॉ. अमर अडके,दुर्ग अभ्यासक

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आईचे अनैतिक संबंध, अल्पवयीन मुलाने तिच्या प्रियकराला संपवलं; कोयत्यानं सपासप वार, हत्येनंतर स्वत:च पोलिसांकडे गेला

सोलापुरात एसीचा भीषण स्फोट; विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण...

मुंबईत मुसळधार, विक्रोळीत दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रखडल्या; प्रवाशांची पायपीट, उशिराने धावताहेत गाड्या

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

SCROLL FOR NEXT