MP sambhaji raje chhatrapati ultimate to maharashtra government in kolhapur 
कोल्हापूर

'सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली तर...' खासदार संभाजी राजेंचा सरकारला इशारा

संदीप खांडेकर

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रात नोकर भरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलिस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असूनसुद्धा पोलिस भरती प्रक्रिया सुरू केली, हे पूर्णतः चुकीचे आहे. 

मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा  कुटील डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत. ते म्हणाले, मराठा समाज इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार. 

जे आरक्षण मिळाले होते, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात  यावेत. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत, कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय सरकार घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीला सुरुवात

सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

Grandmother Rescue Story: राहुरीत भीषण आग; नातींना वाचवण्यासाठी आजीची ज्वाळांत उडी, जीवावर बेतलं धाडस, नेमकं काय घडलं!

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT