mp sanjay mandlik contact with foreign ministers of india  
कोल्हापूर

तेहरानमधील त्या भाविकांच्या सुटकेसाठी खा. मंडलिकांचे प्रयत्न  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - करोना व्हायरसमुळे सर्व देशांनी सतर्कता बाळगल्याने याचा फटका परदेशी पर्यटन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला असून कोल्हापूर जिल्हा व परिसरातील सुमारे 44 पर्यटक इराक आणि इराण परिसरात धार्मिक तीर्थक्षेत्राला गेले असता तेहरान येथे अडकून पडले आहेत. या सर्वांच्या सुटकेसाठी खासदार संजय मंडलिक यांनी तातडीने परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून या सर्वांची लवकरात लवकर तेहरान येथून सुटका व्हावी अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक बोलताना खा. मंडलिक म्हणाले, इराण आणि इराकमध्ये दरवर्षी  हजारो पर्यटक धार्मिक यात्रेकरीता जात असतात.  यावर्षी कोल्हापूर व परिसरातून सुमारे 44 पर्यटक धार्मीक तीर्थेक्षेत्रासाठी तेहरानला गेले. परंतू जगात सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या भितीने विमानांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातल्याने तेहरानमध्ये सर्व भाविक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेकरीता परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. कोल्हापूर व परिसरातील हे सर्व भाविक वयस्कर असून त्यांकडील औषधे व तत्सम साहित्य संपत आले आहेत. त्यांचे नातेवाईक सर्व प्रवाशांच्या सुरक्षित परत येणेच्या चिंतेमुळे त्रस्त झाले असून त्यांना लवकरात लवकर भारतात पाठवावे अशी मागणी खा. मंडलिक यांनी केली असून याबाबत लवकरच कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT