Maratha Reservation Sanjay Mandlik esakal
कोल्हापूर

म्हाकवे-हळदी गावच्या वेशीवरच शिंदे गटाच्या खासदाराला गावकऱ्यांनी रोखलं; मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब

मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंद केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार संजय मंडलिक यांना म्हाकवे व हळदी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश नाकारला.

म्हाकवे : म्हाकवे व हळदी (ता. कागल) येथे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना गावात प्रवेश करताना सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) कार्यकर्त्यांनी रोखले. ‘खासदारांनी मी मराठाच आहे, मराठा आंदोलनाला दसरा चौकातच पाठिंबा जाहीर केला आहे,’ अशी आपली भूमिका समजून सांगितल्यावर त्यांनी गावात प्रवेश केला.

मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंद केला आहे, अशी भूमिका घेत बिद्री साखर कारखान्याच्यानिमित्ताने प्रचार बैठकीसाठी आलेल्या खासदार संजय मंडलिक यांना म्हाकवे व हळदी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश नाकारला.

यावेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी आला, तसे मराठा आरक्षणासाठी काय केले? असा जाब विचारल्यावर खासदार मंडलिक म्हणाले, ‘२४ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तोपर्यंत कुणावरच गावबंदी केलेली नाही. मीसुद्धा मराठा आहे. मी मराठा आंदोलनाला पाठिंबा दसरा चौकातच जाहीर केला आहे. याबद्दल माझी राजीनामा देण्याची तयारी सुद्धा मी दर्शवलेली आहे.’

हळदी येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष पवार, उत्तम व्हरांबळे, सुनील गोरुले, अक्षय चव्हाण, सुनील सावरतकर तर म्हाकवे येथील प्रदीप पाटील,विकास पाटील, पंढरीनाथ पाटील, रामदास पाटील, राजेंद्र पाटील या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय मंडलिक यांचा ताफा अडवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT